पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बटर पनीर मसाला

इमेज
साहित्य : काजू – १/२ पेला. मगज बी – १/४ पेला (पर्यायी). पनीर – १०० ग्रॅम. टोमॅटो – १ मोठा. कोथिंबीर बारीक चिरून – २ टी स्पून. आले लसूण पेस्ट – १ टी स्पून. तमालपत्र (तेजपत्ता) – २-३. लवंग -२. काळी मिरी- ४. दालचिनी- २ इंच. वेलदोडा – १. हिरवी वेलची – ४. चक्रीफुल – १. लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून. धने जिरे पावडर – २ टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर – १ टीस्पून. गरम मसाला पावडर – १/२ टी स्पून. हळद – १/४ टी स्पून. कसुरी मेथी – १ टी स्पून. व्हिनेगर – १ टी स्पून. साखर – चिमूटभर. रेड ऑरेंज फूड कलर – चिमुटभर (पर्यायी). तेल – २ ते ३ टे स्पून. पाणी -१ पेला. काळे मीठ – चिमुटभर. मीठ – चवीनुसार. कृती : सर्वप्रथम काजू धुवून १५ ते ३० मिनीटे कोमट पाण्यात भिजवून घ्या. मगज बी देखील धुवून भिजवा, मगज बी वापरत नसल्यास वरील साहित्यात काजूचे प्रमाण दुप्पट घ्यावे. पनीर धुवून ते १० मिनीटे पाण्यात ठेवा व नंतर त्याचे चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या.पाणी घातल्याने पेस्ट जळणार किंवा पॅन ला चिकटणार नाही व त्याची चव पाण्यात उतरते. आले व लसूण समप्रमाणात घेऊन त्याची अगदी मऊ व पातळ अशी पेस्ट बनवून घ्यावी. आता भिजवलेले काज...

काकडीचे थालीपीठ

इमेज
साहित्य : काकडी – ३ मध्यम. हिरवी मिरची - २ बारीक चिरून. कोथिंबीर – १ टी स्पून बारीक चिरून. आले लसूण पेस्ट – १ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. मिरची पावडर – १/४ टी स्पून. गरम मसाला – १/२ टी स्पून. धने जिरे पावडर - १ टी स्पून. हिंग – चिमूटभर. हळद  – १/४ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. ओवा – १/४ टी स्पून. साखर – १/२ टी स्पून. काळे मीठ – चिमूटभर मीठ – चवीनुसार. पाणी – आवश्यकतेनुसार. गव्हाचं पीठ – १+ १/४ पेला. चण्याच्या डाळीचं पीठ – १/४ पेला. तांदळाचे पीठ – १/२ पेला  ज्वारीचं पीठ – ३ टी स्पून. तेल – ४ ते ५ टीस्पून. कृती : एका थाळीत काकडी किसून घ्या, त्यात वरील इतर सर्व जिन्नस एकत्र करा,  आता पाणी न वापरता भजीच्या मिश्रणासारखे पातळ मिश्रण तयार करा, मिश्रण घट्ट झाले तरच पाण्याचा वापर करावा अन्यथा टाळावा. आता एक फ्राय पॅन गरम करून घ्या. त्यात १ टी स्पून तेल घालून थोडे गरम करा, आता गॅस तीव्र आचेवर ठेवून थालिपीठाचे पीठ घाला, व ते गोल आकारात पसरवा, थालिपीठ अति पातळ तसेच जास्त जाड नसावे,  व झाकण न ठेवता, एक ते दोन मिनिटे शिजवून ते पलटून घ्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या....

चटपटीत बीट गाजर सॅलड

इमेज
सॅलड ऐकलं की खूप बोरिंग पदार्थ डोळ्यासमोर येतो. परंतु याच सॅलडला तुम्ही योग्यपद्धतीने ड्रेसिंग केलंत आणि योग्य पदार्थांच कॉम्बिनशन केलंत तर त्याची चव वाढतेच व अगदी रोज खायला ही हा पदार्थ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. साहित्य: बीट- १/२ लहान. काकडी -१/२ लहान. गाजर - १/२ लहान. टोमॅटो  - १ मध्यम. बारिक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून. बारीक चिरलेली हिरवी मिरची – १/४ टी स्पून (पर्यायी). धने जिरे पावडर - १/४ टी स्पून. काळी मिरी पावडर - १ चिमूटभर. काळे मीठ – चिमूटभर. लिंबाचा रस– १/४ टी स्पून. (आवश्यक) मीठ - चवीनुसार. मंगलोरिअन फरसाण - १ टे स्पून. कृती : वरील सर्व भाज्या अगदी बारीक आकारात चिरुन घ्या. उरलेले साहित्य त्यात घालून हलक्या हाताने मिक्स करा. अगदी झटपट सॅलड तयार झाले. नक्की करून पाहा आणि कंमेंट करून प्रतिक्रिया कळवा तसेच रेसिपी देखील इतरांना शेअर करा. टीप : मंगलोरिअन फरसाण उपलब्ध नसल्यास तुम्ही फक्त वरील इतर साहित्य वापरून देखील हे सलाड करू शकता, परंतु हे फरसाण सॅलड ची चव अणखी वाढवते.

उपवासाचे थालीपीठ

इमेज
उपवासाची मिक्स भाजणी/राजगिरा पीठ - १/२ पेला. बटाटा किसून -१ मध्यम.(कच्चा). हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. जिरे/जिरे पावडर – १/४ टी स्पून. साखर – १/२ टी स्पून. कोथिंबीर बारीक चिरून – १/४ टी स्पून. पाणी – आवश्यकतेनुसार. तूप – १ ते २ टीस्पून. मीठ – चवीनुसार. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि सांडगे किंवा मंचुरीयनच्या पीठाएवढे पातळ करा.  एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे तूप सोडा, व थालीपीठाचे पीठ फ्राय पॅन वर टाका व पसरवून थालीपीठ थापा, जास्त जाड नको, आता ते छान खरपूस भाजून घ्या, एक मिनिटानंतर त्यावर झाकण झाका, व एक मिनिट शिजू द्या, चर्रर् आवाज आल्यास समजावे थालीपीठ व्यवस्थित भाजले गेले आहे आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या. हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी छान खरपूस भाजा. प्रत्येक बाजू भाजण्यास साधारण दिड ते दोन मिनिटे लागतील. टीप : हे थालीपीठ साखर न घालता ताजे घट्ट दही  बरोबर सर्व्ह करा. दह्यासोबत हे थालिपीठ छान चविष्ट लागते. सर्व्ह : वरील मिश्रणातुन मध्यम आकाराची दोन थालिपीठं होतात.

मसाले भात

इमेज
बासमती तांदूळ - २+१/२ वाट्या. लिंबू १/२. कोथिंबीर १ मूठ चिरुन. पुदिना ४-५ काड्या. दही १/३ पेला, 80 ग्राम्स. वाटणे - १/४ पेला. बटाटे -३ मध्यम. कांदे - ३ मोठे उभे चिरून. टोमॅटो – १ प्युरी, १ उभा चिरुन. गाजर – १ लांब. फ्लॉवर – १/२ किलो. तोंडली - ५-६ उभी चिरुन. काजूचे तूकडे - १ टे स्पून (पर्यायी). पनीर क्युब्स - ६-७ (पर्यायी). हिरवी मिरची – १/२ बारीक चिरून, १/२ उभी चिरुन. आले लसूण पेस्ट - १ टेस्पून. हिरवी वेलची - ४ तेजपत्ते - ४ लवंग – ८ ते९ काळी मिरी – ८ ते ९ जवित्री - १/२. चक्रीफूल - १/२. तेल – ३ ते४ टेस्पून. जिरे – १/४ टी स्पून. गरम मसाला पावडर – १ टी स्पून. पाव भाजी मसाला – १/२ टी स्पून. कांदा लसूण मसाला १/४ – टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर – २ टी स्पून. धणे पावडर – २ टी स्पून. कृती : कुकर मध्ये १-२ टेस्पून तेल घालून सर्व भाज्यांचे क्युब्स फ्राय करून घ्या. थोडेसे मीठ घाला, थोडीशी हळद घाला, जिरे घाला, खडे मसाले अर्धे घाला. आता २ कांदे घाला, छान परतून घ्या. कोथिंबीर घाला, पुदिना चिरुन घाला. आता हे मिश्रण बाजूला काढा उरलेले कांदे कुकर मध्ये तेल घालून ब्राउन होईपर्यंत परता, त्यानंतर सर्व पा...

कस्टर्ड शिरा

इमेज
रवा (जाड किंवा मध्यम) - १ वाटी. साखर – १ वाटी. तूप – १/२ वाटी. दूध – १/२ वाटी. पाणी – २+१/२ वाटी. (उकळते पाणी). व्हॅनिला कस्टर्ड पावडर – १ टी स्पून. ड्राय फ्रुटस चे काप – १ टेस्पून. ड्राय फ्रुट पावडर – १ टी स्पून. वेलची पावडर – १/४  टी स्पून. जायफळ पावडर – चिमूटभर. सुंठ पावडर – चिमूटभर. हळद – चिमूटभर. मीठ – चिमूटभर. मनुके – ८-१०. केळं – १/२ (पर्यायी). तुळशी चे पान – १. केवडा एस्सेन्स – १ -२ थेंब. कृती : एका जाड बुडाच्या कढईत रवा १-२ मिनीटे भाजून घ्या मग त्यात तूप घालून ते थोडे परतवून घ्या. आता त्यात ड्रायफ्रूटस चे काप व ड्रायफ्रूट पावडर घाला रव्याचा रंग हलका पिवळसर येईल इतपत भाजा, त्याहून जास्त भाजू नये. आता त्यात हळद, मीठ घालून परतून घ्या, व केळ्याचे पातळ काप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या, आत्ता यात निम्मी साखर घालून मिक्स करून घ्या, व गॅस हाय फ्लॅम वर ठेवून गरम पाणी घाला व लगेचच झाकण ठेवून गॅस लो करा आणि २ मिनीटे शिजू द्या. आता झाकण काढून त्यात गरम दूध,उरलेली साखर, वेलची, जायफळ, सुंठ पावडर घाला, व चांगले मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून ३ ते ४ मिनीटे शिजू द्या. आता झाकण काढून त्यात...

फिश फ्राय

इमेज
साहित्य : पापलेट – ४. (पापलेट ऐवजी इतर कोणताही मासा वापर्य शकता) घरचा मसाला / (मालवणी मसाला) – ३ टी स्पून. गरम मसाला पावडर – २ टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर – ३ टी स्पून. धने पावडर – ३ टी स्पून. हळद पावडर – १/४ टी स्पून. कांदा लसूण मसाला -  १/४ टी स्पून. लिंबाचा रस – २ टी स्पून आले लसूण पेस्ट – ४ टी स्पून पाणी – गरजेनुसार. तेल – २ ते ३ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : पापलेट स्वच्छ करून त्याचे बारीक लांब तुकडे करून धुवून घ्या. तेल सोडून वरील इतर सर्व साहित्य एकत्र करुन घ्या व  तुकड्यांना व्यवस्थित लावून १ तास फ्रिज मध्ये ठेवा. गरज वाटल्यास मसाल्यात थोडे पाणी घालू शकता म्हणजे पापलेट चे तुकडे पुर्णपणे मसाल्याने माखले जातील. आता एका पॅन मध्ये थोडेसे तेल घालून गरम करून घ्या व त्यात पापलेटचे तुकडे थोडे अंतर ठेवून ठेवा, जेणेकरून पलटताना मासे तुटणार नाहीत.  पापलेट चे तुकडे मंद आचेवर भाजून घ्या (साधारण २ ते ३ मिनीटे). आता मासे पालटून दुसरी बाजू देखील लालसर भाजून घ्या. पापलेट फ्राय तयार झाले. हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा स्टार्टर म्हणून पुदिना चटणी बरोबर ही सर्व्ह करू शकता.

प्रॉन्स बिर्याणी

इमेज
प्रॉन्स बिर्याणी ग्रेव्ही. साहित्य : मोठे प्रॉन्स सोलून – १ वाटी. बासमती तांदूळ – २+१/२ पेले. दही – १/३ पेला (८० ग्रॅम). मोठे कांदे – २+१/२ ग्रेव्हीसाठी, ३+१/२ तळण्यासाठी. टोमॅटो – १ प्युरीसाठी, १ उभा पातळ चिरून. मँरिनेशनकरीता : आले पेस्ट १/२ टी स्पून. लसूण पेस्ट - १ टी स्पून. हिरवी मिरची पेस्ट - १/४ टी स्पून घरचा मसाला – २ टी स्पून. काश्मीरी मिरची पावडर – २ टी स्पून. हळद पावडर - १/४ टी स्पून. गरम मसाला पावडर – १ टी स्पून. धणे पावडर – १ टी स्पून. लिंबाचा रस – १/४ लिंबू. मीठ – चवीनुसार (१/२ टी स्पून). ग्रेव्हीकरीता : कांदे - २+१/२ मोठे उभे चिरून. बटाटे – ४ मध्यम (प्रत्येकी ४ मोठ्या तुकड्यात कापून). टोमॅटो – २ मध्यम (१ प्युरी करिता व १ उभा लांब चिरून). दही – १/३ पेला. आले पेस्ट - १/२ टी स्पून. लसूण पेस्ट - १ टी स्पून. हिरवी मिरची पेस्ट – १/४ टी स्पून. घरचा मसाला – २ टी स्पून. काश्मीरी मिरची पावडर – २ टी स्पून. हळद पावडर - १/४ टी स्पून. गरम मसाला पावडर – १ टी स्पून. धणे पावडर – १ टी स्पून. हिरवी मिरची – १/४ टी स्पून बारीक चिरून. हिरवी वेलची -२. तेजपत्ता – २. लवंग – ४. काळी मिरी – ५. दालचि...

मालवणी फिश कढी

इमेज
साहित्य : मासे मुरवण्यासाठी : पापलेट, सुरमई किंवा कोणतेही फिश चे तुकडे – ३ ते ४. कोकम – १. हळद – १/४ चमचा. मीठ – चवीनुसार. वाटणाकरिता : सुक्या लाल मिरच्या (२ शंकेश्वरी, २ काश्मिरी) - ३ ते ४. ओल्या नारळाचा किस/ सुक्या खोबऱ्याचा किस – १/३ वाटी. लसूण – ७ ते ८ पाकळ्या. कोथिंबीर - १ टी स्पून. कांदा चिरुन - १ टी स्पून. धणे – १ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. हळद - १/४ टी स्पून तांदूळ – १ टी स्पून. बारीक चिरलेला टोमॅटो – १/४ वाटी. तिरपल - २ ते ३. पाणी- १/२ ग्लास. फोडणीकरिता : कोकम – ३. लसूण – १ पाकळी. कडीपत्ता - २ ते ३. तेल - १+ १/२ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : वाटणाचे सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र घाला व आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक मऊ पेस्ट करून घ्या. आता एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात एक लसूण पाकळी बारीक चिरून किंवा ठेचून घाला, कडीपत्याची पाने घाला , त्यानंतर वाटलेले वाटण घाला व थोडेसे परतून घ्या, आता ह्यात अर्धा ग्लास पाणी घालून मिश्रण थोडे उकळा. एक उकळी आले की माशांचे तुकडे घाला व ५ ते १० मिनीटे शिजू द्या. तुम्हाला कढी जास्त पातळ आवडत असल्यास आणखी पाणी घालू शकता. कढी तयार आहे ...

बीटरुट कोशिंबीर

इमेज
साहित्य: बीट- १/२ लहान. काकडी -१/२ लहान. टोमॅटो  - १ मध्यम. कांदा – १ मध्यम. दही - १/२ वाटी. बारिक चिरलेली कोथिंबीर – १/४ वाटी. बारीक चिरलेली हिरवी मिरची – १/४ टी स्पून. धने जिरे पावडर - १/४ टी स्पून. लाल मिरची पावडर – चिमूटभर. चाट मसाला - १ चिमूटभर. काळे मीठ – चिमूटभर. साखर – चिमूटभर. मीठ - चवीनुसार. कृती : सर्वप्रथम बीट पातळ जुलीइन्स मध्ये चिरून किंवा जड किसणीवसर किसून घ्यावे. उरलेल्या सर्व भाज्या बारीक चिरुन घ्या. उरलेले साहित्य त्यात घालून चांगले मिक्स करा. व १/२ तास फ्रिज मध्ये ठेवून द्या. व नंतर सर्व्ह करा. टीप : सलाड फ्रिज मध्ये ठेवल्याने ते मऊ पडत नाहीत व भाज्यांचा क्रिस्पीनेस  कायम राहतो.

सुकट ची चटणी

इमेज
साहीत्य : सुकट – १/४ वाटी. कांदे - २ मोठे. टोमॅटो – १ मोठा. लसूण पाकळ्या – ५ ते ६. कांदा लसूण मसाला – १/४ टी स्पून. लाल तिखट (घरचा मसाला) – १ टी स्पून. लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून. धने पावडर – १/४ टी स्पून. हळद पावडर -  १/४ टी स्पून. राई –  १ चिमूट. जिरे –  १ चिमूट. मीठ – चवीनुसार. तेल - १ टे स्पून. कृती : सर्वप्रथम सुकट तव्यावर तेल न घालता भाजून घ्या. सुकट चा रंग बदलला की ती एका परातीत काढुन त्यात गरम पाणी घाला. व ५-६ मिनीटे भिजू द्या. त्यानंतर ती चाळणीत घेऊन स्वछ धुवून घ्या.  एका तव्यावर तेल चांगले तापवून घ्या. त्यात राई घाला, ती चांगली तडतडली की जिरे घाला, जिरे लालसर झाल्यावर ठेचून लसूण पाकळ्या घाला. आता बारीक चिरलेला कांदा घालून तपकिरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात सगळे कोरडे मसाले घालून २ ते ३ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला व टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.त्यानंतर मिश्रण आणखी १-२ मिनीटे छान भाजून घ्या. आता यात सुकट घाला, व सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. मीठ घालुन २-३ मिनीटे झाकण ठेवून शिजवा. सुकट चटणी ...

अंडा मसाला

इमेज
साहीत्य : अंडी उकडलेली -४. कांदे - २ मोठे. टोमॅटो -२ मोठे. लसूण पाकळ्या – ७ ते ८. कांदा लसूण मसाला – १/२ टी स्पून. लाल तिखट (घरचा मसाला) – १ टी स्पून. लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून. धने पावडर – १/४ टी स्पून. हळद पावडर -  १/४ टी स्पून. राई –  १/४ टी स्पून. जिरे –  १/४ टी स्पून. मीठ – चवीनुसार. तेल - १ टे स्पून. कृति :  एका कढईत तेल गरम करून घ्या. त्यात राई घाला, ती चांगली तडतडली की जिरे घाला, जिरे लालसर झाल्यावर ठेचून बारीक कापलेल्या लसूण पाकळ्या घाला. आता बारीक चिरलेला कांदा हलका तपकिरी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्या. आता त्यात सगळे कोरडे मसाले घालून १ ते १/२ मिनिटे परतवून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला व टोमॅटो छान मऊ होऊन तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. आता यात उकडलेली अंडी बारीक कापून घाला, मीठ घाला, व सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. व सर्व मिश्रण दीड ते दोन मिनिटे छान शिजवून घ्या. अंडा मसाला तयार आहे. नक्की करून पाहा, आवडल्यास कंमेंट आणि शेअर करा.

हरा भरा कबाब

इमेज
पालक, बटाटा आणि हिरवे मटार वापरून केला जाणारा अतिशय पौष्टीक परंतु चटपटीत असा लहानांपासून मोठ्यांच्या आवडीचा तसेच, पार्टी स्नॅक्स किंवा घरी नाश्त्यासाठी सहज व कमी तेलात करता येईल असा रेस्टॉरंट स्टाईल प्रसिद्ध भारतीय पदार्थ. साहित्य : उकडलेले बटाटे - २ लहान. हिरवे ताजे मटार -१ वाटी. पालकची पाने  - १ वाटी किंवा प्युरी १/४ चहाचा कप. बारिक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून. हिरवी मिरची जाडसर वाटून - १/२ टी स्पून. आले लसूण क्रश - १/२ टी स्पून. धने जिरे पावडर - १/२ टी स्पून. चाट मसाला - १ चिमूटभर. गरम मसाला पावडर १/२ टी स्पून. मीठ - चवीनुसार. तेल -१ टी स्पून. कॉर्नफ्लोअर - १ टी स्पून. चण्याच्या डाळीचे पीठ – १ टी स्पून. ब्रॅड क्रम्बस- १ टी स्पून. काजू – सजवतीकरिता. कृती: सर्वप्रथम मटार कुकर मध्ये एक भांड्यात अगदी एक ते दोन चमचे पाण्यात उकडून घ्या. व नंतर थोडेसे जाडसर क्रश करून घ्या. उकडलेले बटाटे हे लहान फोडी होतील असे हातानेच कुस्करून घ्या. पालकाची पाने कमी पाण्यात छान उकळून घ्या व फक्त पाने वेगळी करून मिक्सर मध्ये प्युरी करून घ्या. एका पॅन मध्ये १/४ टी स्पून तेल घालून गरम करा. आता त्यात आले ...

चवळीची पालेभाजी

इमेज
लो कॅलोरी, फायबर युक्त, चविष्ट अगदी कमी साहित्यात कमी वेळात व बनवायला सोपी अशी पालेभाजी. साहित्य : चवळीची पालेभाजी -१ जुडी. लसूण पाकळ्या  - १०-१२. हिरव्या मिरच्या -१-२ लहान. मीठ - चवीनुसार. तेल - १ टी स्पून. कृती : चवळीची पाने अगदी कमी देठा सोबत निवडून घ्या व स्वछ धुवून घ्या. हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. एका कढईत तेल तापवून घ्या. त्यात हिरवी मिरची व लसणाचा ठेचा घाला एकदा परतून लगेचच भाजी घाला व चांगली परतून घ्या. आता झाकण ठेवून १-२ मिनीटे शिजवा एकदा परतून आणखी १-२ मिनिटे शिजवा आता मीठ घालुन भाजी परतून घ्या. व पुन्हा झाकण ठेवून १ मिनीटे शिजवा. भाजी तयार आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते. टीप : पालेभाजी शिजल्यावर आळुन कमी होते म्हणून पालेभाजी करताना मीठ नेहमी शेवटी टाकावे म्हणजे भाजी खारट होत नाही.

मिसळ पाव

इमेज
महाराष्ट्रातली प्रसिद्ध सर्वांना आवडणारी स्वादिष्ट आणि पौष्टिक, अगदी घरच्या साहित्यात होणारी सोपी आणि झटपट रेसिपी, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना! चला तर मग पाहुयात कशी करायची ते साहीत्य: पांढरे वाटणे - २५० ग्रॅम. उकडलेले बटाटे - २ मोठे कांदे - ३ मोठे (बारीक चिरून) टोमॅटो -२ मोठे (प्युरी साठी) लिंबू -१/२. जिरे १/२ टी स्पून. राई १/२ टी स्पून. हिंग १/४ टी स्पून. हळद १/४ टी स्पून. आले लसूण पेस्ट २ टी स्पून. लाल मिरची पावडर १+ १/२ टी स्पून. कांदा लसूण मसाला १ टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर १ टी स्पून. गरम मसाला पावडर १ टी स्पून. धने पावडर १+ १/२ टी स्पून. जिरे पावडर १/२ टी स्पून. कढीपत्याची पाने १०-१२. मीठ चवीनुसार. तेल १+ १/२ टेबलस्पून . गरम पाणी -३ ग्लास. कृती: वाटणे रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी ते पूर्णपणे बुडतील एवढे पाणी घालून कुकर ला ७ -८ शिट्ट्या काढून ते शिजवून घ्या. एक मोठ्या कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात राई घालुन ती पूर्णपणे तडतडू द्या त्यानंतर त्यात जिरे घाला व परतून घ्या  आता आले लसूण पेस्ट घालून ती थोडी परतून घ्या. बारीक चिरलेला कांदा घा...

बीट ची भाजी

इमेज
बीट चे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. बीट आपले हिमोग्लोबिन वाढीस मदत करतो, दात आणि हाडं मजबूत बनवतो, तसेच आपली त्वचा व केसांसाठी देखील फायदेशीर आहे. चला मग बीटच्या भाजी ची पौष्टिक रेसिपी पाहुयात! साहित्य : बीट - ५०० ग्रंँम. कांदे - २ मोठे. हिरवी मिरची चिरून - ५,६. खवलेला ओला नारळ - १+१/२ चहाचा कप. लसूण ठेचून - ७,८ पाकळ्या. राई - १/४ टी. स्पून जिरे - १/४ टी. स्पून कढीपत्ता - ७-८ पाने. तेल - १ टेबल स्पून. मीठ - चवीनुसार.  कृती: सर्व प्रथम बीट किसून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात राई घाला व ती  चांगली तडतडू दया. त्यानंतर जिरे घालून लालसर परतावे. आता लसूण घालून पिवळसर होईपर्यंत परतावा मग हिरवी मिरची घालून परता. आता कढीपत्त्याची पाने चुरडून घालावी व बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता त्यानंतर खवलेले खोबरे घालून थोडे तेल सूटेपयँत परतावे. आता कीसलेले बीट घालून परतावे व झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवा, चवीनुसार मीठ घालून परतावे व पुन्हा झाकण ठेवून ३-४ मिनिटे शिजवावे. आता गँस बंद करून झाकण ठेवून २ मिनिटे भाजी वाफू द्यावी. बीटची भाजी तयार आहे. ही भाजी चपाती व ...

चिकन तंदुरी

इमेज
साहित्य :  २५० ग्रॅम चिकन (लेगपीस किवा ब्रेस्टपीस). आले लसूण पेस्ट २ टेस्पून. हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट १ टिस्पून. घट्ट दही ४ टेस्पून (१oo ग्रॅम). लाल तिखट २ टिस्पून.  काश्मिरी लाल तिखट २ टिस्पून (पर्यायी).  गरम मसाला पावडर १ टिस्पून. तंदुरी मसाला पावडर १ टेस्पून (पर्यायी). हळद पावडर १/४ टिस्पून.  १ लिंबाचा रस. कसुरी मेथी १/२ टीस्पून. चवीनुसार मीठ.   कृती :  चिकन पिसेसना लिंबाचा रस, मीठ, हळद, आले लसूण पेस्ट लावून १५ मिनिटे ठेवावे. आता उरलेले सर्व पदार्थ एका भांड्यात मिसळा आणि त्यात चिकन पिसेस घाला. आता हे भांड झाकून  ४-५ तास फ्रीजमध्ये ठेवा.  तुमच्याकडे जास्त वेळ असल्यास तुम्ही ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू शकता.  आता एक तवा चांगला गरम तापवून घ्या, त्यावर चिकनचे पिसेस ठेवा. झाकण ठेवून ते गरम आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजू द्या. नंतर मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवा. आता झाकण काढून तुकड्यांवर थोडे तेल लावा आणि थोडेसे मॅरिनेशन घाला व तुकडे पलटून घ्या. ७-८ मिनिटे शिजवा.  तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा आणि तुम्हाला आवडली तर नक्की कंमे...