मसाले भात



  • बासमती तांदूळ - २+१/२ वाट्या.
  • लिंबू १/२.
  • कोथिंबीर १ मूठ चिरुन.
  • पुदिना ४-५ काड्या.
  • दही १/३ पेला, 80 ग्राम्स.
  • वाटणे - १/४ पेला.
  • बटाटे -३ मध्यम.
  • कांदे - ३ मोठे उभे चिरून.
  • टोमॅटो – १ प्युरी, १ उभा चिरुन.
  • गाजर – १ लांब.
  • फ्लॉवर – १/२ किलो.
  • तोंडली - ५-६ उभी चिरुन.
  • काजूचे तूकडे - १ टे स्पून (पर्यायी).
  • पनीर क्युब्स - ६-७ (पर्यायी).
  • हिरवी मिरची – १/२ बारीक चिरून, १/२ उभी चिरुन.
  • आले लसूण पेस्ट - १ टेस्पून.
  • हिरवी वेलची - ४
  • तेजपत्ते - ४
  • लवंग – ८ ते९
  • काळी मिरी – ८ ते ९
  • जवित्री - १/२.
  • चक्रीफूल - १/२.
  • तेल – ३ ते४ टेस्पून.
  • जिरे – १/४ टी स्पून.
  • गरम मसाला पावडर – १ टी स्पून.
  • पाव भाजी मसाला – १/२ टी स्पून.
  • कांदा लसूण मसाला १/४ – टी स्पून.
  • काश्मिरी मिरची पावडर – २ टी स्पून.
  • धणे पावडर – २ टी स्पून.
कृती:
  • कुकर मध्ये १-२ टेस्पून तेल घालून सर्व भाज्यांचे क्युब्स फ्राय करून घ्या.
  • थोडेसे मीठ घाला, थोडीशी हळद घाला, जिरे घाला, खडे मसाले अर्धे घाला.
  • आता २ कांदे घाला, छान परतून घ्या.
  • कोथिंबीर घाला, पुदिना चिरुन घाला.
  • आता हे मिश्रण बाजूला काढा
  • उरलेले कांदे कुकर मध्ये तेल घालून ब्राउन होईपर्यंत परता, त्यानंतर सर्व पावडर मसाले घाला, व परता, आले लसूण पेस्ट घाला, टोमॅटो काप,  टोमॅटो प्युरी घालून छान मऊ एकजीव होईपर्यन्त परता, सर्व भाज्या घालून फास्ट गॅस वर परता, दही घालून परता, व त्यात पनीर क्युब्स घाला. 
  • एक पातेल्यात तांदूळ अर्धा तास भिजवा त्यात अर्धे खडे मसाले, मिरची उभी चिर्लरली, आले लसूण पेस्ट किंचित घाला. तांदूळ वरती येईल एवढेच पाणी घाला.
  • आता दही नंतर भिजवलेले तांदूळ घालून परता, ३+१/२ चमचे मीठ घाला.
  • थोडेसे तांदूळ वर अर्धे बोट एवढेच पाणी राहू द्या.
  • थोडेसे परतून २ शिट्ट्या काढा.
  • मसालेभात तयार आहे, हा कोशिंबीर बरोबर सर्व्ह करू शकता.

सर्व्ह - ६ जणांकरिता.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत