पोस्ट्स

उपवासाचे पदार्थ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उपवासाचे धिरडे.

इमेज
  राजगिरा पीठ – १ सुक्क्या खोबऱ्याची पावडर – २ टी स्पून. हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. धने जिरे पावडर – १/४ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. बारीक चिरलेली कोथिंबीर - १/२ टी स्पून. पाणी – १/३ पेला. तेल – १ ते २ टीस्पून. काळे मीठ – १/४ टी स्पून. कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि इडलीच्या पीठाएवढे घट्ट असावे. एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे त तेल किंवा तूप गरम करा व गॅस तीव्र आचेवर ठेवून वरील मिश्रण फ्राय पॅन वर गोलाकार पसरा. धिरडे थोडे जाडच ठेवावे, आता झाकण ठेवून ते २ ते ३ मिनीटे छान खरपूस भाजून घ्या आता झाकण काढून आणखी अर्धा ते एक मिनिट शिजू द्या व छान कुरकुरीत भाजू द्या, आता दुसरी बाजू देखील अशाचप्रकारे भाजून घ्या. उपवासाचे धिरडे तयार आहेत.

उपवासाचे काकडीचे थालीपीठ

इमेज
साहित्य : काकडीचा किस -१/२ वाटी. राजगिरा पीठ - १/२ वाटी. हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. धने जिरे पावडर – १/४ टी स्पून. जिरे – चिमुटभर. साखर – १/२ टी स्पून. काळे मनुके – १ चमचा. पाणी – आवश्यकतेनुसार. तूप – १ ते २ टीस्पून. काळे मीठ – चिमूटभर. मीठ – चवीनुसार. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि चपाती चे पीठ मळतो त्यापेक्षा अगदी पातळ असावे. एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे तूप सोडा, व थालीपीठाचे पीठ फ्राय पॅन वर गोलाकार पसरवून थालीपीठ थापा, जास्त जाड नको, आता ते छान खरपूस भाजून घ्या व अर्धा ते एक मिनिट शिजू द्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या. टीप : हे थालीपीठ गोड दही किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

उपवासाचे थालीपीठ

इमेज
उपवासाची मिक्स भाजणी/राजगिरा पीठ - १/२ पेला. बटाटा किसून -१ मध्यम.(कच्चा). हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. जिरे/जिरे पावडर – १/४ टी स्पून. साखर – १/२ टी स्पून. कोथिंबीर बारीक चिरून – १/४ टी स्पून. पाणी – आवश्यकतेनुसार. तूप – १ ते २ टीस्पून. मीठ – चवीनुसार. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि सांडगे किंवा मंचुरीयनच्या पीठाएवढे पातळ करा.  एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे तूप सोडा, व थालीपीठाचे पीठ फ्राय पॅन वर टाका व पसरवून थालीपीठ थापा, जास्त जाड नको, आता ते छान खरपूस भाजून घ्या, एक मिनिटानंतर त्यावर झाकण झाका, व एक मिनिट शिजू द्या, चर्रर् आवाज आल्यास समजावे थालीपीठ व्यवस्थित भाजले गेले आहे आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या. हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी छान खरपूस भाजा. प्रत्येक बाजू भाजण्यास साधारण दिड ते दोन मिनिटे लागतील. टीप : हे थालीपीठ साखर न घालता ताजे घट्ट दही  बरोबर सर्व्ह करा. दह्यासोबत हे थालिपीठ छान चविष्ट लागते. सर्व्ह : वरील मिश्रणातुन मध्यम आकाराची दोन थालिपीठं होतात.