गव्हाचे गोड धिरडे
सणासुदीला किंवा पाहुणे आले की झटपट परंतु गोडाचा बेत करायचा असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात आमरस व त्यासोबत असे धिरडे केले जातात. आमरस देखील गोड व वेलची युक्त असल्याने गव्हाच्या पिठात थोडेसे ज्वारीचे पीठ मिसळून मीठ व पाणी घालून अगदी चविष्ट धिरडे होतात. परंतु ह्याच धिरड्यात थोडासा बदल करून छान नाश्ता करता येतो तो म्हणजे गव्हाचे धिरडे. गव्हाचे गोड धिरडे म्हणजे हा अगदी सोपा, पटकन, कमी साहित्यात होणारा नाश्ता, तसेच लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ. चला तर मग पटकन साहित्य आणि कृती पाहुयात. साहित्य : गव्हाचे पीठ – १ वाटी. दूध - १/२ वाटी. अंडं– १ (पर्यायी). गूळ – १/२ वाटी. वेलची – ४. जायफळ पावडर – चिमूटभर. तूप/तेल – २ ते ३ टी स्पून. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या, व साधारण उत्तप्पा साठी करतो तसे पातळ घोळ बनवून घ्या. एक नॉनस्टिक पॅन चांगला तापवून घ्या, त्यावर तूप घालून ते किंचित गरम होऊ द्या. गॅस तीव्र आचेवर ठेवून त्यावर हे मिश्रण ओता व त्याला मोठा चमचा किंवा वाटीच्या साहाय्याने गोल आकार द्या. गॅस मंद आचेवर ठेवून १ मिनिटाकरता ठेवा व नंतर झाकण ठेवून आणखी १ ते २ मिनीटे शिजू द्या व ...