काकडीचे थालीपीठ
साहित्य:
- काकडी – ३ मध्यम.
- हिरवी मिरची - २ बारीक चिरून.
- कोथिंबीर – १ टी स्पून बारीक चिरून.
- आले लसूण पेस्ट – १ टी स्पून.
- शेंगदाणा कूट – ३ टी स्पून.
- मिरची पावडर – १/४ टी स्पून.
- गरम मसाला – १/२ टी स्पून.
- धने जिरे पावडर - १ टी स्पून.
- हिंग – चिमूटभर.
- हळद – १/४ टी स्पून.
- जिरे – १/४ टी स्पून.
- ओवा – १/४ टी स्पून.
- साखर – १/२ टी स्पून.
- काळे मीठ – चिमूटभर
- मीठ – चवीनुसार.
- पाणी – आवश्यकतेनुसार.
- गव्हाचं पीठ – १+ १/४ पेला.
- चण्याच्या डाळीचं पीठ – १/४ पेला.
- तांदळाचे पीठ – १/२ पेला
- ज्वारीचं पीठ – ३ टी स्पून.
- तेल – ४ ते ५ टीस्पून.
कृती:
- एका थाळीत काकडी किसून घ्या, त्यात वरील इतर सर्व जिन्नस एकत्र करा,
- आता पाणी न वापरता भजीच्या मिश्रणासारखे पातळ मिश्रण तयार करा, मिश्रण घट्ट झाले तरच पाण्याचा वापर करावा अन्यथा टाळावा.
- आता एक फ्राय पॅन गरम करून घ्या. त्यात १ टी स्पून तेल घालून थोडे गरम करा, आता गॅस तीव्र आचेवर ठेवून थालिपीठाचे पीठ घाला, व ते गोल आकारात पसरवा, थालिपीठ अति पातळ तसेच जास्त जाड नसावे,
- व झाकण न ठेवता, एक ते दोन मिनिटे शिजवून ते पलटून घ्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या. दुसरी बाजू तेल न वापरता भाजू शकता.
- थालिपीठ तयार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा