पोस्ट्स

नॉनव्हेज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फिश फ्राय

इमेज
साहित्य : पापलेट – ४. (पापलेट ऐवजी इतर कोणताही मासा वापर्य शकता) घरचा मसाला / (मालवणी मसाला) – ३ टी स्पून. गरम मसाला पावडर – २ टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर – ३ टी स्पून. धने पावडर – ३ टी स्पून. हळद पावडर – १/४ टी स्पून. कांदा लसूण मसाला -  १/४ टी स्पून. लिंबाचा रस – २ टी स्पून आले लसूण पेस्ट – ४ टी स्पून पाणी – गरजेनुसार. तेल – २ ते ३ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : पापलेट स्वच्छ करून त्याचे बारीक लांब तुकडे करून धुवून घ्या. तेल सोडून वरील इतर सर्व साहित्य एकत्र करुन घ्या व  तुकड्यांना व्यवस्थित लावून १ तास फ्रिज मध्ये ठेवा. गरज वाटल्यास मसाल्यात थोडे पाणी घालू शकता म्हणजे पापलेट चे तुकडे पुर्णपणे मसाल्याने माखले जातील. आता एका पॅन मध्ये थोडेसे तेल घालून गरम करून घ्या व त्यात पापलेटचे तुकडे थोडे अंतर ठेवून ठेवा, जेणेकरून पलटताना मासे तुटणार नाहीत.  पापलेट चे तुकडे मंद आचेवर भाजून घ्या (साधारण २ ते ३ मिनीटे). आता मासे पालटून दुसरी बाजू देखील लालसर भाजून घ्या. पापलेट फ्राय तयार झाले. हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा स्टार्टर म्हणून पुदिना चटणी बरोबर ही सर्व्ह करू शकता.

मालवणी फिश कढी

इमेज
साहित्य : मासे मुरवण्यासाठी : पापलेट, सुरमई किंवा कोणतेही फिश चे तुकडे – ३ ते ४. कोकम – १. हळद – १/४ चमचा. मीठ – चवीनुसार. वाटणाकरिता : सुक्या लाल मिरच्या (२ शंकेश्वरी, २ काश्मिरी) - ३ ते ४. ओल्या नारळाचा किस/ सुक्या खोबऱ्याचा किस – १/३ वाटी. लसूण – ७ ते ८ पाकळ्या. कोथिंबीर - १ टी स्पून. कांदा चिरुन - १ टी स्पून. धणे – १ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. हळद - १/४ टी स्पून तांदूळ – १ टी स्पून. बारीक चिरलेला टोमॅटो – १/४ वाटी. तिरपल - २ ते ३. पाणी- १/२ ग्लास. फोडणीकरिता : कोकम – ३. लसूण – १ पाकळी. कडीपत्ता - २ ते ३. तेल - १+ १/२ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : वाटणाचे सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र घाला व आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक मऊ पेस्ट करून घ्या. आता एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात एक लसूण पाकळी बारीक चिरून किंवा ठेचून घाला, कडीपत्याची पाने घाला , त्यानंतर वाटलेले वाटण घाला व थोडेसे परतून घ्या, आता ह्यात अर्धा ग्लास पाणी घालून मिश्रण थोडे उकळा. एक उकळी आले की माशांचे तुकडे घाला व ५ ते १० मिनीटे शिजू द्या. तुम्हाला कढी जास्त पातळ आवडत असल्यास आणखी पाणी घालू शकता. कढी तयार आहे ...

सुकट ची चटणी

इमेज
साहीत्य : सुकट – १/४ वाटी. कांदे - २ मोठे. टोमॅटो – १ मोठा. लसूण पाकळ्या – ५ ते ६. कांदा लसूण मसाला – १/४ टी स्पून. लाल तिखट (घरचा मसाला) – १ टी स्पून. लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून. धने पावडर – १/४ टी स्पून. हळद पावडर -  १/४ टी स्पून. राई –  १ चिमूट. जिरे –  १ चिमूट. मीठ – चवीनुसार. तेल - १ टे स्पून. कृती : सर्वप्रथम सुकट तव्यावर तेल न घालता भाजून घ्या. सुकट चा रंग बदलला की ती एका परातीत काढुन त्यात गरम पाणी घाला. व ५-६ मिनीटे भिजू द्या. त्यानंतर ती चाळणीत घेऊन स्वछ धुवून घ्या.  एका तव्यावर तेल चांगले तापवून घ्या. त्यात राई घाला, ती चांगली तडतडली की जिरे घाला, जिरे लालसर झाल्यावर ठेचून लसूण पाकळ्या घाला. आता बारीक चिरलेला कांदा घालून तपकिरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात सगळे कोरडे मसाले घालून २ ते ३ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला व टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.त्यानंतर मिश्रण आणखी १-२ मिनीटे छान भाजून घ्या. आता यात सुकट घाला, व सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. मीठ घालुन २-३ मिनीटे झाकण ठेवून शिजवा. सुकट चटणी ...

अंडा मसाला

इमेज
साहीत्य : अंडी उकडलेली -४. कांदे - २ मोठे. टोमॅटो -२ मोठे. लसूण पाकळ्या – ७ ते ८. कांदा लसूण मसाला – १/२ टी स्पून. लाल तिखट (घरचा मसाला) – १ टी स्पून. लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून. धने पावडर – १/४ टी स्पून. हळद पावडर -  १/४ टी स्पून. राई –  १/४ टी स्पून. जिरे –  १/४ टी स्पून. मीठ – चवीनुसार. तेल - १ टे स्पून. कृति :  एका कढईत तेल गरम करून घ्या. त्यात राई घाला, ती चांगली तडतडली की जिरे घाला, जिरे लालसर झाल्यावर ठेचून बारीक कापलेल्या लसूण पाकळ्या घाला. आता बारीक चिरलेला कांदा हलका तपकिरी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्या. आता त्यात सगळे कोरडे मसाले घालून १ ते १/२ मिनिटे परतवून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला व टोमॅटो छान मऊ होऊन तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. आता यात उकडलेली अंडी बारीक कापून घाला, मीठ घाला, व सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. व सर्व मिश्रण दीड ते दोन मिनिटे छान शिजवून घ्या. अंडा मसाला तयार आहे. नक्की करून पाहा, आवडल्यास कंमेंट आणि शेअर करा.