अंडा मसाला




साहीत्य:
  • अंडी उकडलेली -४.
  • कांदे - २ मोठे.
  • टोमॅटो -२ मोठे.
  • लसूण पाकळ्या – ७ ते ८.
  • कांदा लसूण मसाला – १/२ टी स्पून.
  • लाल तिखट (घरचा मसाला) – १ टी स्पून.
  • लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून.
  • धने पावडर – १/४ टी स्पून.
  • हळद पावडर -  १/४ टी स्पून.
  • राई –  १/४ टी स्पून.
  • जिरे –  १/४ टी स्पून.
  • मीठ – चवीनुसार.
  • तेल - १ टे स्पून.

कृति:
  •  एका कढईत तेल गरम करून घ्या.
  • त्यात राई घाला, ती चांगली तडतडली की जिरे घाला, जिरे लालसर झाल्यावर ठेचून बारीक कापलेल्या लसूण पाकळ्या घाला.
  • आता बारीक चिरलेला कांदा हलका तपकिरी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्या.
  • आता त्यात सगळे कोरडे मसाले घालून १ ते १/२ मिनिटे परतवून घ्या.
  • त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला व टोमॅटो छान मऊ होऊन तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
  • आता यात उकडलेली अंडी बारीक कापून घाला, मीठ घाला, व सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • व सर्व मिश्रण दीड ते दोन मिनिटे छान शिजवून घ्या.
  • अंडा मसाला तयार आहे.
  • नक्की करून पाहा, आवडल्यास कंमेंट आणि शेअर करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत