चिकन टिक्का (ऑईल फ्री)
चिकनमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते, त्यामध्ये चरबी कमी असते. हे चयापचय वाढविण्यास मदत करते.
म्हणून आज आपण एक सुपर इझी चिकन रेसिपी पाहू.
साहित्य:
२५० ग्रॅम बोनलेस चिकन (बारीक तुकडे).
दही २ टेस्पून.
आले लसूण पेस्ट १ टिस्पून.
लाल तिखट १ टीस्पून.
काश्मिरी लाल तिखट १/२ टीस्पून (पर्यायी).
हळद पावडर १/४ टीस्पून.
धणे पूड १ टीस्पून.
जिरे पूड १/२ टीस्पून.
लिंबाचा रस १ टीस्पून.
कसुरी मेथी (पर्यायी).
चवीनुसार मीठ.
ऑरेंज रेड फूड कलर 1 चिमूट (पर्यायी).
कृती:
- प्रथम चिकन चांगले धुवून घ्या.
- नंतर सर्व साहित्य एक-एक करुन घालून एकत्र करा आणि चिकन मध्ये घाला आणि १५ मिनिटांनसाठी मॅरीनेट करा.
- नंतर तवा चांगला गरम करून चिकनचे तुकडे त्यावर पसरवा व मॅरीनेशन ही घाला.
- चिकन चांगले काळपट तपकीरी रंगाचे डाग येईपर्यंत भाजू दया. ह्यास साधारण ४-५ मिनीटे लागतील.
- आता दुसरी बाजू देखील ३-४ मिनिटे भाजून घ्या.
- वेळ कमी असल्यास चिकन तव्यावर शिजवून घेऊन नंतर स्टीलच्या स्क्यूमध्ये ठेवून थेट गॅसवर ठेवून भाजू शकता जेणेकरून त्याला स्मोकी फ्लेवर येतो.
- आता चिकन टिक्का सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. कांद्याच्या गोल काप व कोथिंबीर घालून रायता किंवा शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करा.
- तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा आणि तुम्हाला आवडली तर नक्की कंमेंट आणि शेअर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा