पालक सूप



पालक हा आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे, त्यामध्ये  बऱ्याच प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत, हे कमी कॅलरी आणि उच्च प्रथिनेयुक्त अन्न आहे ज्याचा आपण आपल्या रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. 

म्हणूनच आजची पाककृती आहे पालक सूप. हे सूप बाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना दिले जाऊ शकते. आणि हे बनविणे  देखील खूप सोपे आहे. तर ते कसे करायचे ते पाहू.

साहित्य:
  • पालकची जुडी  १ / २.
  • बारीक चिरलेला लसूण १/४ टीस्पून. 
  • हिरव्या मिरचीचे  २ - 3 बारीक तुकडे. 
  • तेल १/२ टीस्पून.
  • मीठ एक चिमूटभर.
  • पाणी १ आणि १/२ पेला. 
कृती:
  • प्रथम पालकची पाने स्वछ धुवुन घ्या, पाने ही थोड्याशा देठांसाहित निवडावी.
  •  एक कढईत १/२ पेला पाणी आणि पालकची पाने घाला.
  • (पाने थोडी कापुन घेतली तरीही चालतील). 
  • आता ही पाने ३-४ मिनिटे उकळवून घ्या. व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फक्त पाने घालून प्युरी वाटून घ्या व पाणी बाजूला काढून ठेवा.
  • एक कढई घेऊन त्यात तेल गरम करा चिरलेला लसूण घालून किंचित पिवळा होईपर्यंत तळा. 
  • आता हिरव्या मिरच्याचे तुकडे घाला नंतर पालकची प्युरी घाला आणि ती थोडीशी परतून घ्या. आता पालक उकळलेले पाणी व मीठ घाला, आवडीनुसार तुम्ही पाणी जास्त घालू शकता आता हे सूप उकळी येईपर्यंत शिजवा.
  • पालक सुप तयार आहे. 
  • तर अगदी सोपी सहज होणारी रेसिपी आहे नक्की करून पाहा, शेअर करा कंमेंट करा.
टीप: आपण अधिक पाणी घालून सूप पातळ करू शकता. बाळांसाठी हे सूप तयार करताना तेल, लसूण व मिरचीचा वापर करू नये. बालरोगतज्ञच्या सल्याने आपण मीठ वापरू शकता.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत