वांग्याचं भरीत



साहित्य:
  • मोठे काळे वांगे – १.
  • लसूण – १ गड्डी (१२ ते १५ पाकळ्या).
  • हिरव्या मिरच्या - ४.
  • आले – १/४ इंच.
  • जिरे – १/४ टी स्पून.
  • राई – १/४ टी स्पून.
  • हळद -१/४ टी स्पून.
  • हिंग – १/४ टी स्पून.
  • कडीपत्ता – ६ ते ७ पाने.
  • तेल – ५ ते ६ टी स्पून.
  • मीठ – चवीनुसार.
कृती:
  • वांगं गॅस वर ठेवून सर्व बाजूनी साल पूर्ण काळी होऊन पापुद्रे निघेपर्यंत भाजून घ्यावे.
  • आता ते थंड होऊ द्या.
  • लसूण, आले हिरवी मिरचीचा खरखरीत जाडसर ठेचा मिक्सर ला वाटून घ्या.
  • वांगं थंड झाल्यावर त्याची साल काढून वरचे वर पाण्याने धुवून घ्या व मधून कापून घ्या.
  • आता एक तवा गरम करून त्यावर तेल घाला, तयार राई घालून तडतडू द्या त्यानंतर जिरे घालून परतून घ्या व कडीपत्ता थोडा चुरडून घाला.
  • त्यानंतर मिक्सर मध्ये वाटलेलं ठेचा घालून हळद व हिंग घाला आणि १ मिनिटं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या.
  • आता त्यात वांग घाला व ते तव्यावरच कुस्करून घ्या.
  • मीठ घालून सर्व मिश्रण एक ते दीड मिनिटे चांगले परतवून घ्या. 
  • व झाकण ठेवून दीड ते २ मिनीटे शिजू द्या परंतु मध्ये मध्ये परतत राहावे जेणेकरून भाजी तव्यावर चिकटणार नाही.
  • आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात आणखी तेल घालू शकता, वांग्याचे भरीत करताना तेलाचा वापर जास्त केला जातो यामुळे वांग्याचा वातूळपणा कमी होऊन ते पोटास बाधत नाही शिवाय त्याची चव ही वाढते.
  • पाणी पूर्णपणे आटून भाजी कोरडी झाली की गॅस बंद करा.
  • झटपट स्वादिष्ट वांग्याचं भरीत तयार आहे, नक्की करुन पहा व रेसिपी आवडल्यास शेअर व कंमेंट नक्की करा.
टीप: वांगं भाजण्यापूर्वी त्यावर थोडा तेलाचा हात फिरवल्यास त्याची साल सहज निघते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी