पोस्ट्स

चटण्या लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोडक्याची चटणी (शिराळ्याची चटणी)

इमेज
  साहित्य  : दोडका - २५० ग्रॅम. हिरव्या मिरच्या – ३ ते ४. लसूण – ८ ते ९ पाकळ्या. राई - चिमूटभर. जिरे – चिमूटभर. हळद – १/४ टी स्पून. हिंग – १/४ टी स्पून. तेल – २ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती  : कोवळे दोडके स्वछ धुवून त्याच्या साली काढून टाकुन अगदी बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची व लसणाचा जाड ठेचा वाटून घ्या. आता एका कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात राई घाला ती तडतडली की जिरे घाला, आता हिरवी मिरची व लसूण चा जाडसर ठेचा घाला ती किंचित परतवून त्यात  हळद व हिंग घाला व ते मिक्स करुन त्यात बारीक चिरलेला दोडका घाला, सर्व मिश्रण चांगले परतवून घ्या. व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून ३-४ मिनीटे शिजू द्या व अध्ये मध्ये परतत राहा. आता झाकण काढून पाणी पूर्ण आटेपर्यंत चटणी परतत राहा.  पाणी आटून चटणी कोरडी झाली की गॅस बंद करा. दोडक्याची झटपट, चविष्ट चटणी तयार आहे नक्की करून पाहा, व आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

दोडक्याच्या सालीची चटणी.

इमेज
दोडक्याच्या सालीत खूप जीवनसत्त्वे असतात, ती फेकून न देता त्याची पौष्टिक व चविष्ट चटणी करता येते. चला तर मग कृती पाहूयात. साहित्य : दोडक्याच्या साली – २ वाट्या. हिरव्या मिरच्या – ४. लसूण – १/२ गड्डी. जिरे – चिमूटभर. हळद – १/४ टी स्पून. हिंग – १/४ टी स्पून. तीळ – १ चमचा. तेल – ३ चमचे. मीठ – चवीनुसार. कृती : कोवळे दोडके स्वछ धुवून त्याच्या साली छिलून घ्याव्यात. आता या साली परत धुवून त्यात मिरच्या, लसूण आणि किंचित मीठ घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्याव्यात. मिक्सर थांबून थांबून चालवावा म्हणजे चटणी झटकन बारीक होणार नाही. आता एका कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात तीळ घालून थोडे परतून घ्या, तीळ उडू लागतील त्यामुळे त्यावर झाकण ठेवू शकता. तीळ चांगले तडतडले तांबूस रंगाचे झाले की त्यात थोडे जिरे घाला व परतून मिक्सर ला वाटलेली चटणी घाला, हळद, हिंग व मीठ घाला व सगळे छान ,२-३ मिनीटे परतून घ्या. ही चटणी छान कुरकुरीत होईपर्यंत परतावी. आवश्यक वाटल्यास झाकण ठेवावे व मध्ये मध्ये परतत राहावे गरज असल्यास मध्ये थोडे तेल घालावे. ही चटणी पूर्णपणे शिजवायला ५ ते ७ मिनीटे लागतात. तेव्हा ही झटपट चविष्ट चटणी नक...