बीट ची भाजी

बीट चे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. बीट आपले हिमोग्लोबिन वाढीस मदत करतो, दात आणि हाडं मजबूत बनवतो, तसेच आपली त्वचा व केसांसाठी देखील फायदेशीर आहे.

चला मग बीटच्या भाजी ची पौष्टिक रेसिपी पाहुयात!

साहित्य:

  • बीट - ५०० ग्रंँम.
  • कांदे - २ मोठे.
  • हिरवी मिरची चिरून - ५,६.
  • खवलेला ओला नारळ - १+१/२ चहाचा कप.
  • लसूण ठेचून - ७,८ पाकळ्या.
  • राई - १/४ टी. स्पून
  • जिरे - १/४ टी. स्पून
  • कढीपत्ता - ७-८ पाने.
  • तेल - १ टेबल स्पून.
  • मीठ - चवीनुसार.

 कृती:

  • सर्व प्रथम बीट किसून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करून त्यात राई घाला व ती  चांगली तडतडू दया. त्यानंतर जिरे घालून लालसर परतावे.
  • आता लसूण घालून पिवळसर होईपर्यंत परतावा मग हिरवी मिरची घालून परता.
  • आता कढीपत्त्याची पाने चुरडून घालावी व बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता त्यानंतर खवलेले खोबरे घालून थोडे तेल सूटेपयँत परतावे.
  • आता कीसलेले बीट घालून परतावे व झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवा, चवीनुसार मीठ घालून परतावे व पुन्हा झाकण ठेवून ३-४ मिनिटे शिजवावे. आता गँस बंद करून झाकण ठेवून २ मिनिटे भाजी वाफू द्यावी.
  • बीटची भाजी तयार आहे. ही भाजी चपाती व भात दोन्ही सोबत छान लागते.
  • नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की कंमेंट आणि शेअर करा, त्याचबरोबर तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की कळवा.




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत