दोडक्याची चटणी (शिराळ्याची चटणी)
साहित्य :
- दोडका - २५० ग्रॅम.
- हिरव्या मिरच्या – ३ ते ४.
- लसूण – ८ ते ९ पाकळ्या.
- राई - चिमूटभर.
- जिरे – चिमूटभर.
- हळद – १/४ टी स्पून.
- हिंग – १/४ टी स्पून.
- तेल – २ टी स्पून.
- मीठ – चवीनुसार.
कृती :
- कोवळे दोडके स्वछ धुवून त्याच्या साली काढून टाकुन अगदी बारीक चिरून घ्या.
- हिरवी मिरची व लसणाचा जाड ठेचा वाटून घ्या.
- आता एका कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात राई घाला ती तडतडली की जिरे घाला, आता हिरवी मिरची व लसूण चा जाडसर ठेचा घाला ती किंचित परतवून त्यात
- हळद व हिंग घाला व ते मिक्स करुन त्यात बारीक चिरलेला दोडका घाला, सर्व मिश्रण चांगले परतवून घ्या.
- व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून ३-४ मिनीटे शिजू द्या व अध्ये मध्ये परतत राहा.
- आता झाकण काढून पाणी पूर्ण आटेपर्यंत चटणी परतत राहा. पाणी आटून चटणी कोरडी झाली की गॅस बंद करा.
- दोडक्याची झटपट, चविष्ट चटणी तयार आहे नक्की करून पाहा, व आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा