चिकन तंदुरी
साहित्य:
- २५० ग्रॅम चिकन (लेगपीस किवा ब्रेस्टपीस).
- आले लसूण पेस्ट २ टेस्पून.
- हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट १ टिस्पून.
- घट्ट दही ४ टेस्पून (१oo ग्रॅम).
- लाल तिखट २ टिस्पून.
- काश्मिरी लाल तिखट २ टिस्पून (पर्यायी).
- गरम मसाला पावडर १ टिस्पून.
- तंदुरी मसाला पावडर १ टेस्पून (पर्यायी).
- हळद पावडर १/४ टिस्पून.
- १ लिंबाचा रस.
- कसुरी मेथी १/२ टीस्पून.
- चवीनुसार मीठ.
कृती:
- चिकन पिसेसना लिंबाचा रस, मीठ, हळद, आले लसूण पेस्ट लावून १५ मिनिटे ठेवावे.
- आता उरलेले सर्व पदार्थ एका भांड्यात मिसळा आणि त्यात चिकन पिसेस घाला.
- आता हे भांड झाकून ४-५ तास फ्रीजमध्ये ठेवा.
- तुमच्याकडे जास्त वेळ असल्यास तुम्ही ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू शकता.
- आता एक तवा चांगला गरम तापवून घ्या, त्यावर चिकनचे पिसेस ठेवा.
- झाकण ठेवून ते गरम आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजू द्या. नंतर मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवा. आता झाकण काढून तुकड्यांवर थोडे तेल लावा आणि थोडेसे मॅरिनेशन घाला व तुकडे पलटून घ्या. ७-८ मिनिटे शिजवा.
- तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा आणि तुम्हाला आवडली तर नक्की कंमेंट आणि शेअर करा.
टीपः
तंदुरी शिजल्यानंतर चिकनचे पिसेस गॅसवर रॅक ठेवून त्यावर १/२ ते १ मिनिट भाजू शकता म्हणजे तुम्हाला स्मोकी फ्लेवर मिळेल.
तंदुरी तयार आहे आता पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा