पोस्ट्स

स्टार्टर्स लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पनीर चिली

इमेज
साहित्य : पनीर – १०० ग्रॅम. हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन – ४. कांदे लांब चिरुन – १+१/२ वाटी. कांद्याची पात बारीक चिरुन – २ टे स्पून. शिमला मिरची लांब चिरुन– १/२ वाटी. कोबी लांब चिरुन – १/४ वाटी. लसूण पाकळ्या बारीक चिरून – ७ ते ८. आले– १/२ इंच. आले लसूण ची पातळ पेस्ट – २ टे स्पून. सोया सॉस- २ टी स्पून. रेड चिली सॉस – २ टी स्पून. व्हिनेगर – १/२ टी स्पून. शेजवान चटणी – २ टी स्पून. काळी मिरी क्रश – १/२ टी स्पून. साखर – चिमूटभर. तेल – २ ते ३ टे स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : एक नॉनस्टिक पॅन चांगला गरम तापवून घ्या, त्यावर थोडे तेल घालून ते चांगले तापवून घ्या,  त्यात बरीक चिरलेला लसूण घाला, व पातळ लांब काड्यांमध्ये कापलेले आले घाला, तेल खूप गरम तापले की फोडणी उडते त्याची सावधानता बाळगा. लसूण व आले थोडे पिवळसर रंगावर परतून घ्या व मिरच्या घाला व परता आता त्यात बारीक चिरलेली कांद्याची पात घालून छान परता. आता यात कोबी घालुन १ ते २ मिनीटे परतून घ्या. आता शिमला मिरची घालून ती देखील १ ते २ मिनीटे परतून घ्या सर्व भाज्या निम्म्या परतून झाल्या की त्यात कांदे घाला. ह्या सर्व भाज्या गॅस तीव्र आचेवर ठेव...

फिश फ्राय

इमेज
साहित्य : पापलेट – ४. (पापलेट ऐवजी इतर कोणताही मासा वापर्य शकता) घरचा मसाला / (मालवणी मसाला) – ३ टी स्पून. गरम मसाला पावडर – २ टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर – ३ टी स्पून. धने पावडर – ३ टी स्पून. हळद पावडर – १/४ टी स्पून. कांदा लसूण मसाला -  १/४ टी स्पून. लिंबाचा रस – २ टी स्पून आले लसूण पेस्ट – ४ टी स्पून पाणी – गरजेनुसार. तेल – २ ते ३ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : पापलेट स्वच्छ करून त्याचे बारीक लांब तुकडे करून धुवून घ्या. तेल सोडून वरील इतर सर्व साहित्य एकत्र करुन घ्या व  तुकड्यांना व्यवस्थित लावून १ तास फ्रिज मध्ये ठेवा. गरज वाटल्यास मसाल्यात थोडे पाणी घालू शकता म्हणजे पापलेट चे तुकडे पुर्णपणे मसाल्याने माखले जातील. आता एका पॅन मध्ये थोडेसे तेल घालून गरम करून घ्या व त्यात पापलेटचे तुकडे थोडे अंतर ठेवून ठेवा, जेणेकरून पलटताना मासे तुटणार नाहीत.  पापलेट चे तुकडे मंद आचेवर भाजून घ्या (साधारण २ ते ३ मिनीटे). आता मासे पालटून दुसरी बाजू देखील लालसर भाजून घ्या. पापलेट फ्राय तयार झाले. हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा स्टार्टर म्हणून पुदिना चटणी बरोबर ही सर्व्ह करू शकता.

हरा भरा कबाब

इमेज
पालक, बटाटा आणि हिरवे मटार वापरून केला जाणारा अतिशय पौष्टीक परंतु चटपटीत असा लहानांपासून मोठ्यांच्या आवडीचा तसेच, पार्टी स्नॅक्स किंवा घरी नाश्त्यासाठी सहज व कमी तेलात करता येईल असा रेस्टॉरंट स्टाईल प्रसिद्ध भारतीय पदार्थ. साहित्य : उकडलेले बटाटे - २ लहान. हिरवे ताजे मटार -१ वाटी. पालकची पाने  - १ वाटी किंवा प्युरी १/४ चहाचा कप. बारिक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून. हिरवी मिरची जाडसर वाटून - १/२ टी स्पून. आले लसूण क्रश - १/२ टी स्पून. धने जिरे पावडर - १/२ टी स्पून. चाट मसाला - १ चिमूटभर. गरम मसाला पावडर १/२ टी स्पून. मीठ - चवीनुसार. तेल -१ टी स्पून. कॉर्नफ्लोअर - १ टी स्पून. चण्याच्या डाळीचे पीठ – १ टी स्पून. ब्रॅड क्रम्बस- १ टी स्पून. काजू – सजवतीकरिता. कृती: सर्वप्रथम मटार कुकर मध्ये एक भांड्यात अगदी एक ते दोन चमचे पाण्यात उकडून घ्या. व नंतर थोडेसे जाडसर क्रश करून घ्या. उकडलेले बटाटे हे लहान फोडी होतील असे हातानेच कुस्करून घ्या. पालकाची पाने कमी पाण्यात छान उकळून घ्या व फक्त पाने वेगळी करून मिक्सर मध्ये प्युरी करून घ्या. एका पॅन मध्ये १/४ टी स्पून तेल घालून गरम करा. आता त्यात आले ...

चिकन टिक्का (ऑईल फ्री)

इमेज
चिकनमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते, त्यामध्ये चरबी कमी असते. हे चयापचय वाढविण्यास मदत करते.  म्हणून आज आपण एक सुपर इझी चिकन रेसिपी पाहू.  साहित्य:   २५० ग्रॅम बोनलेस चिकन (बारीक तुकडे). दही २ टेस्पून. आले लसूण पेस्ट १ टिस्पून. लाल तिखट १ टीस्पून. काश्मिरी लाल तिखट १/२ टीस्पून (पर्यायी). हळद पावडर १/४ टीस्पून. धणे पूड १ टीस्पून. जिरे पूड १/२ टीस्पून. लिंबाचा रस १ टीस्पून. कसुरी मेथी (पर्यायी). चवीनुसार मीठ. ऑरेंज रेड फूड कलर 1 चिमूट (पर्यायी).   कृती:   प्रथम चिकन चांगले धुवून घ्या. नंतर सर्व साहित्य एक-एक करुन घालून एकत्र करा आणि चिकन मध्ये घाला आणि १५ मिनिटांनसाठी मॅरीनेट करा. नंतर तवा चांगला गरम करून चिकनचे तुकडे त्यावर पसरवा व मॅरीनेशन ही घाला. चिकन चांगले काळपट तपकीरी रंगाचे डाग येईपर्यंत भाजू दया. ह्यास साधारण ४-५ मिनीटे लागतील. आता दुसरी बाजू देखील ३-४ मिनिटे भाजून घ्या. वेळ कमी असल्यास चिकन तव्यावर शिजवून घेऊन नंतर स्टीलच्या स्क्यूमध्ये ठेवून थेट गॅसवर ठेवून भाजू शकता जेणेकरून त्याला स्मोकी फ्लेवर येतो. आता चिकन टिक्का सर्व्ह करण्यासाठी त...