पोस्ट्स

तंदूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चिकन तंदुरी

इमेज
साहित्य :  २५० ग्रॅम चिकन (लेगपीस किवा ब्रेस्टपीस). आले लसूण पेस्ट २ टेस्पून. हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट १ टिस्पून. घट्ट दही ४ टेस्पून (१oo ग्रॅम). लाल तिखट २ टिस्पून.  काश्मिरी लाल तिखट २ टिस्पून (पर्यायी).  गरम मसाला पावडर १ टिस्पून. तंदुरी मसाला पावडर १ टेस्पून (पर्यायी). हळद पावडर १/४ टिस्पून.  १ लिंबाचा रस. कसुरी मेथी १/२ टीस्पून. चवीनुसार मीठ.   कृती :  चिकन पिसेसना लिंबाचा रस, मीठ, हळद, आले लसूण पेस्ट लावून १५ मिनिटे ठेवावे. आता उरलेले सर्व पदार्थ एका भांड्यात मिसळा आणि त्यात चिकन पिसेस घाला. आता हे भांड झाकून  ४-५ तास फ्रीजमध्ये ठेवा.  तुमच्याकडे जास्त वेळ असल्यास तुम्ही ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू शकता.  आता एक तवा चांगला गरम तापवून घ्या, त्यावर चिकनचे पिसेस ठेवा. झाकण ठेवून ते गरम आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजू द्या. नंतर मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवा. आता झाकण काढून तुकड्यांवर थोडे तेल लावा आणि थोडेसे मॅरिनेशन घाला व तुकडे पलटून घ्या. ७-८ मिनिटे शिजवा.  तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा आणि तुम्हाला आवडली तर नक्की कंमे...

चिकन टिक्का (ऑईल फ्री)

इमेज
चिकनमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते, त्यामध्ये चरबी कमी असते. हे चयापचय वाढविण्यास मदत करते.  म्हणून आज आपण एक सुपर इझी चिकन रेसिपी पाहू.  साहित्य:   २५० ग्रॅम बोनलेस चिकन (बारीक तुकडे). दही २ टेस्पून. आले लसूण पेस्ट १ टिस्पून. लाल तिखट १ टीस्पून. काश्मिरी लाल तिखट १/२ टीस्पून (पर्यायी). हळद पावडर १/४ टीस्पून. धणे पूड १ टीस्पून. जिरे पूड १/२ टीस्पून. लिंबाचा रस १ टीस्पून. कसुरी मेथी (पर्यायी). चवीनुसार मीठ. ऑरेंज रेड फूड कलर 1 चिमूट (पर्यायी).   कृती:   प्रथम चिकन चांगले धुवून घ्या. नंतर सर्व साहित्य एक-एक करुन घालून एकत्र करा आणि चिकन मध्ये घाला आणि १५ मिनिटांनसाठी मॅरीनेट करा. नंतर तवा चांगला गरम करून चिकनचे तुकडे त्यावर पसरवा व मॅरीनेशन ही घाला. चिकन चांगले काळपट तपकीरी रंगाचे डाग येईपर्यंत भाजू दया. ह्यास साधारण ४-५ मिनीटे लागतील. आता दुसरी बाजू देखील ३-४ मिनिटे भाजून घ्या. वेळ कमी असल्यास चिकन तव्यावर शिजवून घेऊन नंतर स्टीलच्या स्क्यूमध्ये ठेवून थेट गॅसवर ठेवून भाजू शकता जेणेकरून त्याला स्मोकी फ्लेवर येतो. आता चिकन टिक्का सर्व्ह करण्यासाठी त...