पोस्ट्स

डेसर्ट/स्वीट्स लेबलसह पोस्ट दाखवत आहे

साबुदाणा मूगडाळ पायसम (खीर)

इमेज
साहित्य: साबुदाणा - १/४ वाटी. मूगडाळ - १/२ वाटी. गूळ – १ वाटी. नारळाचे दूध – १ वाटी ( नारळाचे दूध नसल्यास तुम्ही गायीचे दूध देखील वापरू शकता). काजू बदामाचे तुकडे – १/४ वाटी. मनुके – २ चमचे. खारीकचे तुकडे – १ चमचा. सुक्क्या खोबऱ्याचे तुकडे – १ चमचा. वेलची -४. तूप – २ टी स्पून. कृती : साबुदाणा धुवुन त्यात साबुदाण्याच्यावर १/४ इंच बोट बुडेल इतके पाणी घालून रात्रभर भिजवावे. साबुदाणा व मूगडाळ वेगवेगळ्या भांड्यात कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून ड्रायफ्रूटस, खारीक, खोबरयाचे चे तुकडे घालून किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर त्यात साबुदाणा व थोडे पाणी घालून शिजवून घ्या. मध्ये मध्ये थोडे ढवळत राहा. २ ते ३  मिनिटाने शिजवलेली मूगडाळ घाला. १-२ मिनिटांनी त्यात दूध घाला व मंद आचेवर साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत शिजवा, त्यांनतर त्यात गूळ व वेलची पावडर घालून उकळी येईपर्यंत शिजवा. तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ करा, आवश्यक असल्यास तुम्ही यात आणखी दूध घालू शकता. खीर तयार आहे तुम्ही यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटस घालून सजवू शकता.

कस्टर्ड शिरा

इमेज
रवा (जाड किंवा मध्यम) - १ वाटी. साखर – १ वाटी. तूप – १/२ वाटी. दूध – १/२ वाटी. पाणी – २+१/२ वाटी. (उकळते पाणी). व्हॅनिला कस्टर्ड पावडर – १ टी स्पून. ड्राय फ्रुटस चे काप – १ टेस्पून. ड्राय फ्रुट पावडर – १ टी स्पून. वेलची पावडर – १/४  टी स्पून. जायफळ पावडर – चिमूटभर. सुंठ पावडर – चिमूटभर. हळद – चिमूटभर. मीठ – चिमूटभर. मनुके – ८-१०. केळं – १/२ (पर्यायी). तुळशी चे पान – १. केवडा एस्सेन्स – १ -२ थेंब. कृती : एका जाड बुडाच्या कढईत रवा १-२ मिनीटे भाजून घ्या मग त्यात तूप घालून ते थोडे परतवून घ्या. आता त्यात ड्रायफ्रूटस चे काप व ड्रायफ्रूट पावडर घाला रव्याचा रंग हलका पिवळसर येईल इतपत भाजा, त्याहून जास्त भाजू नये. आता त्यात हळद, मीठ घालून परतून घ्या, व केळ्याचे पातळ काप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या, आत्ता यात निम्मी साखर घालून मिक्स करून घ्या, व गॅस हाय फ्लॅम वर ठेवून गरम पाणी घाला व लगेचच झाकण ठेवून गॅस लो करा आणि २ मिनीटे शिजू द्या. आता झाकण काढून त्यात गरम दूध,उरलेली साखर, वेलची, जायफळ, सुंठ पावडर घाला, व चांगले मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून ३ ते ४ मिनीटे शिजू द्या. आता झाकण काढून त्यात...