साबुदाणा मूगडाळ पायसम (खीर)



साहित्य:
  • साबुदाणा - १/४ वाटी.
  • मूगडाळ - १/२ वाटी.
  • गूळ – १ वाटी.
  • नारळाचे दूध – १ वाटी ( नारळाचे दूध नसल्यास तुम्ही गायीचे दूध देखील वापरू शकता).
  • काजू बदामाचे तुकडे – १/४ वाटी.
  • मनुके – २ चमचे.
  • खारीकचे तुकडे – १ चमचा.
  • सुक्क्या खोबऱ्याचे तुकडे – १ चमचा.
  • वेलची -४.
  • तूप – २ टी स्पून.
कृती:
  • साबुदाणा धुवुन त्यात साबुदाण्याच्यावर १/४ इंच बोट बुडेल इतके पाणी घालून रात्रभर भिजवावे.
  • साबुदाणा व मूगडाळ वेगवेगळ्या भांड्यात कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यावे.
  • एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून ड्रायफ्रूटस, खारीक, खोबरयाचे चे तुकडे घालून किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे.
  • त्यानंतर त्यात साबुदाणा व थोडे पाणी घालून शिजवून घ्या. मध्ये मध्ये थोडे ढवळत राहा.
  • २ ते ३  मिनिटाने शिजवलेली मूगडाळ घाला.
  • १-२ मिनिटांनी त्यात दूध घाला व मंद आचेवर साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत शिजवा, त्यांनतर त्यात गूळ व वेलची पावडर घालून उकळी येईपर्यंत शिजवा.
  • तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ करा, आवश्यक असल्यास तुम्ही यात आणखी दूध घालू शकता.
  • खीर तयार आहे तुम्ही यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटस घालून सजवू शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत