पोस्ट्स

कोशिंबीर/ सॅलड लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चटपटीत बीट गाजर सॅलड

इमेज
सॅलड ऐकलं की खूप बोरिंग पदार्थ डोळ्यासमोर येतो. परंतु याच सॅलडला तुम्ही योग्यपद्धतीने ड्रेसिंग केलंत आणि योग्य पदार्थांच कॉम्बिनशन केलंत तर त्याची चव वाढतेच व अगदी रोज खायला ही हा पदार्थ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. साहित्य: बीट- १/२ लहान. काकडी -१/२ लहान. गाजर - १/२ लहान. टोमॅटो  - १ मध्यम. बारिक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून. बारीक चिरलेली हिरवी मिरची – १/४ टी स्पून (पर्यायी). धने जिरे पावडर - १/४ टी स्पून. काळी मिरी पावडर - १ चिमूटभर. काळे मीठ – चिमूटभर. लिंबाचा रस– १/४ टी स्पून. (आवश्यक) मीठ - चवीनुसार. मंगलोरिअन फरसाण - १ टे स्पून. कृती : वरील सर्व भाज्या अगदी बारीक आकारात चिरुन घ्या. उरलेले साहित्य त्यात घालून हलक्या हाताने मिक्स करा. अगदी झटपट सॅलड तयार झाले. नक्की करून पाहा आणि कंमेंट करून प्रतिक्रिया कळवा तसेच रेसिपी देखील इतरांना शेअर करा. टीप : मंगलोरिअन फरसाण उपलब्ध नसल्यास तुम्ही फक्त वरील इतर साहित्य वापरून देखील हे सलाड करू शकता, परंतु हे फरसाण सॅलड ची चव अणखी वाढवते.

बीटरुट कोशिंबीर

इमेज
साहित्य: बीट- १/२ लहान. काकडी -१/२ लहान. टोमॅटो  - १ मध्यम. कांदा – १ मध्यम. दही - १/२ वाटी. बारिक चिरलेली कोथिंबीर – १/४ वाटी. बारीक चिरलेली हिरवी मिरची – १/४ टी स्पून. धने जिरे पावडर - १/४ टी स्पून. लाल मिरची पावडर – चिमूटभर. चाट मसाला - १ चिमूटभर. काळे मीठ – चिमूटभर. साखर – चिमूटभर. मीठ - चवीनुसार. कृती : सर्वप्रथम बीट पातळ जुलीइन्स मध्ये चिरून किंवा जड किसणीवसर किसून घ्यावे. उरलेल्या सर्व भाज्या बारीक चिरुन घ्या. उरलेले साहित्य त्यात घालून चांगले मिक्स करा. व १/२ तास फ्रिज मध्ये ठेवून द्या. व नंतर सर्व्ह करा. टीप : सलाड फ्रिज मध्ये ठेवल्याने ते मऊ पडत नाहीत व भाज्यांचा क्रिस्पीनेस  कायम राहतो.