चटपटीत बीट गाजर सॅलड
सॅलड ऐकलं की खूप बोरिंग पदार्थ डोळ्यासमोर येतो. परंतु याच सॅलडला तुम्ही योग्यपद्धतीने ड्रेसिंग केलंत आणि योग्य पदार्थांच कॉम्बिनशन केलंत तर त्याची चव वाढतेच व अगदी रोज खायला ही हा पदार्थ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल.
साहित्य:
- बीट- १/२ लहान.
- काकडी -१/२ लहान.
- गाजर - १/२ लहान.
- टोमॅटो - १ मध्यम.
- बारिक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून.
- बारीक चिरलेली हिरवी मिरची – १/४ टी स्पून (पर्यायी).
- धने जिरे पावडर - १/४ टी स्पून.
- काळी मिरी पावडर - १ चिमूटभर.
- काळे मीठ – चिमूटभर.
- लिंबाचा रस– १/४ टी स्पून. (आवश्यक)
- मीठ - चवीनुसार.
- मंगलोरिअन फरसाण - १ टे स्पून.
कृती:
- वरील सर्व भाज्या अगदी बारीक आकारात चिरुन घ्या.
- उरलेले साहित्य त्यात घालून हलक्या हाताने मिक्स करा.
- अगदी झटपट सॅलड तयार झाले.
- नक्की करून पाहा आणि कंमेंट करून प्रतिक्रिया कळवा तसेच रेसिपी देखील इतरांना शेअर करा.
टीप:
मंगलोरिअन फरसाण उपलब्ध नसल्यास तुम्ही फक्त वरील इतर साहित्य वापरून देखील हे सलाड करू शकता, परंतु हे फरसाण सॅलड ची चव अणखी वाढवते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा