बीटरुट कोशिंबीर




साहित्य:
  • बीट- १/२ लहान.
  • काकडी -१/२ लहान.
  • टोमॅटो  - १ मध्यम.
  • कांदा – १ मध्यम.
  • दही - १/२ वाटी.
  • बारिक चिरलेली कोथिंबीर – १/४ वाटी.
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – १/४ टी स्पून.
  • धने जिरे पावडर - १/४ टी स्पून.
  • लाल मिरची पावडर – चिमूटभर.
  • चाट मसाला - १ चिमूटभर.
  • काळे मीठ – चिमूटभर.
  • साखर – चिमूटभर.
  • मीठ - चवीनुसार.
कृती:
सर्वप्रथम बीट पातळ जुलीइन्स मध्ये चिरून किंवा जड किसणीवसर किसून घ्यावे.
उरलेल्या सर्व भाज्या बारीक चिरुन घ्या.
उरलेले साहित्य त्यात घालून चांगले मिक्स करा. व १/२ तास फ्रिज मध्ये ठेवून द्या. व नंतर सर्व्ह करा.

टीप: सलाड फ्रिज मध्ये ठेवल्याने ते मऊ पडत नाहीत व भाज्यांचा क्रिस्पीनेस  कायम राहतो.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत