साहित्य : काकडी – ३ मध्यम. हिरवी मिरची - २ बारीक चिरून. कोथिंबीर – १ टी स्पून बारीक चिरून. आले लसूण पेस्ट – १ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. मिरची पावडर – १/४ टी स्पून. गरम मसाला – १/२ टी स्पून. धने जिरे पावडर - १ टी स्पून. हिंग – चिमूटभर. हळद – १/४ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. ओवा – १/४ टी स्पून. साखर – १/२ टी स्पून. काळे मीठ – चिमूटभर मीठ – चवीनुसार. पाणी – आवश्यकतेनुसार. गव्हाचं पीठ – १+ १/४ पेला. चण्याच्या डाळीचं पीठ – १/४ पेला. तांदळाचे पीठ – १/२ पेला ज्वारीचं पीठ – ३ टी स्पून. तेल – ४ ते ५ टीस्पून. कृती : एका थाळीत काकडी किसून घ्या, त्यात वरील इतर सर्व जिन्नस एकत्र करा, आता पाणी न वापरता भजीच्या मिश्रणासारखे पातळ मिश्रण तयार करा, मिश्रण घट्ट झाले तरच पाण्याचा वापर करावा अन्यथा टाळावा. आता एक फ्राय पॅन गरम करून घ्या. त्यात १ टी स्पून तेल घालून थोडे गरम करा, आता गॅस तीव्र आचेवर ठेवून थालिपीठाचे पीठ घाला, व ते गोल आकारात पसरवा, थालिपीठ अति पातळ तसेच जास्त जाड नसावे, व झाकण न ठेवता, एक ते दोन मिनिटे शिजवून ते पलटून घ्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा