कस्टर्ड शिरा
- रवा (जाड किंवा मध्यम) - १ वाटी.
- साखर – १ वाटी.
- तूप – १/२ वाटी.
- दूध – १/२ वाटी.
- पाणी – २+१/२ वाटी. (उकळते पाणी).
- व्हॅनिला कस्टर्ड पावडर – १ टी स्पून.
- ड्राय फ्रुटस चे काप – १ टेस्पून.
- ड्राय फ्रुट पावडर – १ टी स्पून.
- वेलची पावडर – १/४ टी स्पून.
- जायफळ पावडर – चिमूटभर.
- सुंठ पावडर – चिमूटभर.
- हळद – चिमूटभर.
- मीठ – चिमूटभर.
- मनुके – ८-१०.
- केळं – १/२ (पर्यायी).
- तुळशी चे पान – १.
- केवडा एस्सेन्स – १ -२ थेंब.
कृती:
- एका जाड बुडाच्या कढईत रवा १-२ मिनीटे भाजून घ्या मग त्यात तूप घालून ते थोडे परतवून घ्या.
- आता त्यात ड्रायफ्रूटस चे काप व ड्रायफ्रूट पावडर घाला
- रव्याचा रंग हलका पिवळसर येईल इतपत भाजा, त्याहून जास्त भाजू नये.
- आता त्यात हळद, मीठ घालून परतून घ्या, व केळ्याचे पातळ काप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या, आत्ता यात निम्मी साखर घालून मिक्स करून घ्या, व गॅस हाय फ्लॅम वर ठेवून गरम पाणी घाला व लगेचच झाकण ठेवून गॅस लो करा आणि २ मिनीटे शिजू द्या.
- आता झाकण काढून त्यात गरम दूध,उरलेली साखर, वेलची, जायफळ, सुंठ पावडर घाला, व चांगले मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून ३ ते ४ मिनीटे शिजू द्या.
- आता झाकण काढून त्यात मनुके व केवडा एस्सेन्स घालून शिरा व्यवस्थित मिक्स करून घ्या, शिरयावर एक तुळशीचे पान ठेवा. व शिरा १ मिनीटे झाकून शिजू द्या
- आता झाकण काढून तुळशीचे पान बाजूला काढा शीर व्यवस्थित मिक्स करून २ ते ३ मिनीटे शिजू द्या.
- कस्टर्ड शिरा तयार आहे.
- हा शिरा नक्की करून पाहा, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.आणि अशाच नवीन इंटरेस्टिंग पोस्टच्या अपडेट्स मिळवण्यासाठी पोटोबा ब्लॉग ला फॉलो करा.
टीप: शिरा करण्यासाठी जाड रवा वापरावा शिरा चिकट न होता सुटसुटीत होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा