फिश फ्राय
साहित्य:
- पापलेट – ४. (पापलेट ऐवजी इतर कोणताही मासा वापर्य शकता)
- घरचा मसाला / (मालवणी मसाला) – ३ टी स्पून.
- गरम मसाला पावडर – २ टी स्पून.
- काश्मिरी मिरची पावडर – ३ टी स्पून.
- धने पावडर – ३ टी स्पून.
- हळद पावडर – १/४ टी स्पून.
- कांदा लसूण मसाला - १/४ टी स्पून.
- लिंबाचा रस – २ टी स्पून
- आले लसूण पेस्ट – ४ टी स्पून
- पाणी – गरजेनुसार.
- तेल – २ ते ३ टी स्पून.
- मीठ – चवीनुसार.
कृती:
- पापलेट स्वच्छ करून त्याचे बारीक लांब तुकडे करून धुवून घ्या.
- तेल सोडून वरील इतर सर्व साहित्य एकत्र करुन घ्या व तुकड्यांना व्यवस्थित लावून १ तास फ्रिज मध्ये ठेवा. गरज वाटल्यास मसाल्यात थोडे पाणी घालू शकता म्हणजे पापलेट चे तुकडे पुर्णपणे मसाल्याने माखले जातील.
- आता एका पॅन मध्ये थोडेसे तेल घालून गरम करून घ्या व त्यात पापलेटचे तुकडे थोडे अंतर ठेवून ठेवा, जेणेकरून पलटताना मासे तुटणार नाहीत.
- पापलेट चे तुकडे मंद आचेवर भाजून घ्या (साधारण २ ते ३ मिनीटे). आता मासे पालटून दुसरी बाजू देखील लालसर भाजून घ्या.
- पापलेट फ्राय तयार झाले.
- हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा स्टार्टर म्हणून पुदिना चटणी बरोबर ही सर्व्ह करू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा