पनीर चिली
साहित्य:
- पनीर – १०० ग्रॅम.
- हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन – ४.
- कांदे लांब चिरुन – १+१/२ वाटी.
- कांद्याची पात बारीक चिरुन – २ टे स्पून.
- शिमला मिरची लांब चिरुन– १/२ वाटी.
- कोबी लांब चिरुन – १/४ वाटी.
- लसूण पाकळ्या बारीक चिरून – ७ ते ८.
- आले– १/२ इंच.
- आले लसूण ची पातळ पेस्ट – २ टे स्पून.
- सोया सॉस- २ टी स्पून.
- रेड चिली सॉस – २ टी स्पून.
- व्हिनेगर – १/२ टी स्पून.
- शेजवान चटणी – २ टी स्पून.
- काळी मिरी क्रश – १/२ टी स्पून.
- साखर – चिमूटभर.
- तेल – २ ते ३ टे स्पून.
- मीठ – चवीनुसार.
कृती:
- एक नॉनस्टिक पॅन चांगला गरम तापवून घ्या, त्यावर थोडे तेल घालून ते चांगले तापवून घ्या,
- त्यात बरीक चिरलेला लसूण घाला, व पातळ लांब काड्यांमध्ये कापलेले आले घाला, तेल खूप गरम तापले की फोडणी उडते त्याची सावधानता बाळगा.
- लसूण व आले थोडे पिवळसर रंगावर परतून घ्या व मिरच्या घाला व परता आता त्यात बारीक चिरलेली कांद्याची पात घालून छान परता.
- आता यात कोबी घालुन १ ते २ मिनीटे परतून घ्या.
- आता शिमला मिरची घालून ती देखील १ ते २ मिनीटे परतून घ्या सर्व भाज्या निम्म्या परतून झाल्या की त्यात कांदे घाला.
- ह्या सर्व भाज्या गॅस तीव्र आचेवर ठेवूनच परताव्यात, अधून मधून गॅस मंद आचेवर करू शकता जेणेकरून भाज्या करपणार नाहीत.
- आता यात मीठ, साखर घालून भाज्यांना ते व्यवस्थित लागेपर्यंत परतून घ्या व आता आले लसूण पेस्ट घालून तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतुन घ्या.
- सर्व सॉसेस घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. वरून काळी मिरी क्रश घालून ती चांगली एकत्र करा, आता पनीर चे हवे तसे तुकडे करून ते घाला व ते १ ते २ मिनीटे परतून घ्या, व झाकण ठेवून एक ते दीड मिनीटे पनीर शिजू द्या.
- पनीर चिली तयार आहे. ही गरम गरम सर्व्ह करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा