दोडक्याच्या सालीची चटणी.
दोडक्याच्या सालीत खूप जीवनसत्त्वे असतात, ती फेकून न देता त्याची पौष्टिक व चविष्ट चटणी करता येते. चला तर मग कृती पाहूयात.
साहित्य :
- दोडक्याच्या साली – २ वाट्या.
- हिरव्या मिरच्या – ४.
- लसूण – १/२ गड्डी.
- जिरे – चिमूटभर.
- हळद – १/४ टी स्पून.
- हिंग – १/४ टी स्पून.
- तीळ – १ चमचा.
- तेल – ३ चमचे.
- मीठ – चवीनुसार.
कृती :
- कोवळे दोडके स्वछ धुवून त्याच्या साली छिलून घ्याव्यात.
- आता या साली परत धुवून त्यात मिरच्या, लसूण आणि किंचित मीठ घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्याव्यात.
- मिक्सर थांबून थांबून चालवावा म्हणजे चटणी झटकन बारीक होणार नाही.
- आता एका कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात तीळ घालून थोडे परतून घ्या, तीळ उडू लागतील त्यामुळे त्यावर झाकण ठेवू शकता.
- तीळ चांगले तडतडले तांबूस रंगाचे झाले की त्यात थोडे जिरे घाला व परतून मिक्सर ला वाटलेली चटणी घाला, हळद, हिंग व मीठ घाला व सगळे छान ,२-३ मिनीटे परतून घ्या.
- ही चटणी छान कुरकुरीत होईपर्यंत परतावी.
- आवश्यक वाटल्यास झाकण ठेवावे व मध्ये मध्ये परतत राहावे गरज असल्यास मध्ये थोडे तेल घालावे.
- ही चटणी पूर्णपणे शिजवायला ५ ते ७ मिनीटे लागतात.
- तेव्हा ही झटपट चविष्ट चटणी नक्की करून पाहा, व आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
टीप: दीड ते दोन वाटया साली निघण्यासाठी अर्धा किलो दोडका आवश्यक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा