सुकट ची चटणी
साहीत्य:
- सुकट – १/४ वाटी.
- कांदे - २ मोठे.
- टोमॅटो – १ मोठा.
- लसूण पाकळ्या – ५ ते ६.
- कांदा लसूण मसाला – १/४ टी स्पून.
- लाल तिखट (घरचा मसाला) – १ टी स्पून.
- लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून.
- धने पावडर – १/४ टी स्पून.
- हळद पावडर - १/४ टी स्पून.
- राई – १ चिमूट.
- जिरे – १ चिमूट.
- मीठ – चवीनुसार.
- तेल - १ टे स्पून.
कृती:
- सर्वप्रथम सुकट तव्यावर तेल न घालता भाजून घ्या.
- सुकट चा रंग बदलला की ती एका परातीत काढुन त्यात गरम पाणी घाला. व ५-६ मिनीटे भिजू द्या. त्यानंतर ती चाळणीत घेऊन स्वछ धुवून घ्या.
- एका तव्यावर तेल चांगले तापवून घ्या.
- त्यात राई घाला, ती चांगली तडतडली की जिरे घाला, जिरे लालसर झाल्यावर ठेचून लसूण पाकळ्या घाला.
- आता बारीक चिरलेला कांदा घालून तपकिरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या.
- आता त्यात सगळे कोरडे मसाले घालून २ ते ३ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.
- त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला व टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.त्यानंतर मिश्रण आणखी १-२ मिनीटे छान भाजून घ्या.
- आता यात सुकट घाला, व सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. मीठ घालुन २-३ मिनीटे झाकण ठेवून शिजवा.
- सुकट चटणी तयार आहे.
- तर नक्की करून पाहा, आवडल्यास कंमेंट आणि शेर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा