मालवणी फिश कढी
साहित्य:
मासे मुरवण्यासाठी:
- पापलेट, सुरमई किंवा कोणतेही फिश चे तुकडे – ३ ते ४.
- कोकम – १.
- हळद – १/४ चमचा.
- मीठ – चवीनुसार.
वाटणाकरिता:
- सुक्या लाल मिरच्या (२ शंकेश्वरी, २ काश्मिरी) - ३ ते ४.
- ओल्या नारळाचा किस/ सुक्या खोबऱ्याचा किस – १/३ वाटी.
- लसूण – ७ ते ८ पाकळ्या.
- कोथिंबीर - १ टी स्पून.
- कांदा चिरुन - १ टी स्पून.
- धणे – १ टी स्पून.
- जिरे – १/४ टी स्पून.
- हळद - १/४ टी स्पून
- तांदूळ – १ टी स्पून.
- बारीक चिरलेला टोमॅटो – १/४ वाटी.
- तिरपल - २ ते ३.
- पाणी- १/२ ग्लास.
फोडणीकरिता:
- कोकम – ३.
- लसूण – १ पाकळी.
- कडीपत्ता - २ ते ३.
- तेल - १+ १/२ टी स्पून.
- मीठ – चवीनुसार.
कृती:
- वाटणाचे सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र घाला व आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक मऊ पेस्ट करून घ्या.
- आता एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात एक लसूण पाकळी बारीक चिरून किंवा ठेचून घाला, कडीपत्याची पाने घाला , त्यानंतर वाटलेले वाटण घाला व थोडेसे परतून घ्या, आता ह्यात अर्धा ग्लास पाणी घालून मिश्रण थोडे उकळा.
- एक उकळी आले की माशांचे तुकडे घाला व ५ ते १० मिनीटे शिजू द्या.
- तुम्हाला कढी जास्त पातळ आवडत असल्यास आणखी पाणी घालू शकता.
- कढी तयार आहे त्यावर लिंबू पिळून सर्व्ह करा, ही कढी भात, भाकरी व चपाती सोबत ही छान लागते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा