मिसळ पाव
महाराष्ट्रातली प्रसिद्ध सर्वांना आवडणारी स्वादिष्ट आणि पौष्टिक, अगदी घरच्या साहित्यात होणारी सोपी आणि झटपट रेसिपी, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना! चला तर मग पाहुयात कशी करायची ते
साहीत्य:
- पांढरे वाटणे - २५० ग्रॅम.
- उकडलेले बटाटे - २ मोठे
- कांदे - ३ मोठे (बारीक चिरून)
- टोमॅटो -२ मोठे (प्युरी साठी)
- लिंबू -१/२.
- जिरे १/२ टी स्पून.
- राई १/२ टी स्पून.
- हिंग १/४ टी स्पून.
- हळद १/४ टी स्पून.
- आले लसूण पेस्ट २ टी स्पून.
- लाल मिरची पावडर १+ १/२ टी स्पून.
- कांदा लसूण मसाला १ टी स्पून.
- काश्मिरी मिरची पावडर १ टी स्पून.
- गरम मसाला पावडर १ टी स्पून.
- धने पावडर १+ १/२ टी स्पून.
- जिरे पावडर १/२ टी स्पून.
- कढीपत्याची पाने १०-१२.
- मीठ चवीनुसार.
- तेल १+ १/२ टेबलस्पून.
- गरम पाणी -३ ग्लास.
कृती:
- वाटणे रात्रभर भिजत ठेवा
- दुसऱ्या दिवशी ते पूर्णपणे बुडतील एवढे पाणी घालून कुकर ला ७ -८ शिट्ट्या काढून ते शिजवून घ्या.
- एक मोठ्या कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात राई घालुन ती पूर्णपणे तडतडू द्या त्यानंतर त्यात जिरे घाला व परतून घ्या
- आता आले लसूण पेस्ट घालून ती थोडी परतून घ्या. बारीक चिरलेला कांदा घाला व सोनेरी रंगावर परतवून घ्या.
- आता त्यात हळद आणि हिंग, कढीपत्ता घालुन परतवून घ्या त्यानंतर लाल मिरची पावडर, काश्मिरी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला पावडर, धने जिरे पावडर घालून छान लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
- आता त्यात वाटणे कुस्करून घाला, व बटाट्याचे तुकडे करून घाला व ३-४ मिनिटे परतवून घ्या.
- आता त्यात गरम पाणी घालून मिश्रण छान उकळू द्या. २-३ मिनीटे शिजवून लिंबाचा रस घालून मिक्स करा व कोथिंबीर घाला व गॅस बंद करा.
- मिसळ तयार आहे, फरसाण, कांदा व पावसोबत सर्व्ह करा.
- मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तेव्हा नक्की करून पाहा, कंमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
Yummy 😋
उत्तर द्याहटवाDhanyawad 🙏
हटवा