उपवासाचे धिरडे.

 

  • राजगिरा पीठ – १
  • सुक्क्या खोबऱ्याची पावडर – २ टी स्पून.
  • हिरवी मिरची बारीक चिरून– १.
  • आले किसून – १/४ टी स्पून.
  • धने जिरे पावडर – १/४ टी स्पून.
  • जिरे – १/४ टी स्पून.
  • बारीक चिरलेली कोथिंबीर - १/२ टी स्पून.
  • पाणी – १/३ पेला.
  • तेल – १ ते २ टीस्पून.
  • काळे मीठ – १/४ टी स्पून.

कृती:

  • वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि इडलीच्या पीठाएवढे घट्ट असावे.
  • एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे त तेल किंवा तूप गरम करा व गॅस तीव्र आचेवर ठेवून वरील मिश्रण फ्राय पॅन वर गोलाकार पसरा.
  • धिरडे थोडे जाडच ठेवावे, आता झाकण ठेवून ते २ ते ३ मिनीटे छान खरपूस भाजून घ्या आता झाकण काढून आणखी अर्धा ते एक मिनिट शिजू द्या व छान कुरकुरीत भाजू द्या, आता दुसरी बाजू देखील अशाचप्रकारे भाजून घ्या.
  • उपवासाचे धिरडे तयार आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत