उपवासाचे काकडीचे थालीपीठ



साहित्य:

  • काकडीचा किस -१/२ वाटी.
  • राजगिरा पीठ - १/२ वाटी.
  • हिरवी मिरची बारीक चिरून– १.
  • आले किसून – १/४ टी स्पून.
  • शेंगदाणा कूट – ३ टी स्पून.
  • धने जिरे पावडर – १/४ टी स्पून.
  • जिरे – चिमुटभर.
  • साखर – १/२ टी स्पून.
  • काळे मनुके – १ चमचा.
  • पाणी – आवश्यकतेनुसार.
  • तूप – १ ते २ टीस्पून.
  • काळे मीठ – चिमूटभर.
  • मीठ – चवीनुसार.

कृती:

  • वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि चपाती चे पीठ मळतो त्यापेक्षा अगदी पातळ असावे.
  • एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे तूप सोडा, व थालीपीठाचे पीठ फ्राय पॅन वर गोलाकार पसरवून थालीपीठ थापा, जास्त जाड नको, आता ते छान खरपूस भाजून घ्या व अर्धा ते एक मिनिट शिजू द्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या.

टीप: हे थालीपीठ गोड दही किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत