उपवासाचे थालीपीठ
- उपवासाची मिक्स भाजणी/राजगिरा पीठ - १/२ पेला.
- बटाटा किसून -१ मध्यम.(कच्चा).
- हिरवी मिरची बारीक चिरून– १.
- आले किसून – १/४ टी स्पून.
- शेंगदाणा कूट – ३ टी स्पून.
- जिरे/जिरे पावडर – १/४ टी स्पून.
- साखर – १/२ टी स्पून.
- कोथिंबीर बारीक चिरून – १/४ टी स्पून.
- पाणी – आवश्यकतेनुसार.
- तूप – १ ते २ टीस्पून.
- मीठ – चवीनुसार.
कृती:
- वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि सांडगे किंवा मंचुरीयनच्या पीठाएवढे पातळ करा.
- एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे तूप सोडा, व थालीपीठाचे पीठ फ्राय पॅन वर टाका व पसरवून थालीपीठ थापा, जास्त जाड नको, आता ते छान खरपूस भाजून घ्या, एक मिनिटानंतर त्यावर झाकण झाका, व एक मिनिट शिजू द्या, चर्रर् आवाज आल्यास समजावे थालीपीठ व्यवस्थित भाजले गेले आहे आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या.
- हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी छान खरपूस भाजा. प्रत्येक बाजू भाजण्यास साधारण दिड ते दोन मिनिटे लागतील.
टीप: हे थालीपीठ साखर न घालता ताजे घट्ट दही बरोबर सर्व्ह करा. दह्यासोबत हे थालिपीठ छान चविष्ट लागते.
सर्व्ह: वरील मिश्रणातुन मध्यम आकाराची दोन थालिपीठं होतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा