बटर पनीर मसाला
साहित्य:
- काजू – १/२ पेला.
- मगज बी – १/४ पेला (पर्यायी).
- पनीर – १०० ग्रॅम.
- टोमॅटो – १ मोठा.
- कोथिंबीर बारीक चिरून – २ टी स्पून.
- आले लसूण पेस्ट – १ टी स्पून.
- तमालपत्र (तेजपत्ता) – २-३.
- लवंग -२.
- काळी मिरी- ४.
- दालचिनी- २ इंच.
- वेलदोडा – १.
- हिरवी वेलची – ४.
- चक्रीफुल – १.
- लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून.
- धने जिरे पावडर – २ टी स्पून.
- काश्मिरी मिरची पावडर – १ टीस्पून.
- गरम मसाला पावडर – १/२ टी स्पून.
- हळद – १/४ टी स्पून.
- कसुरी मेथी – १ टी स्पून.
- व्हिनेगर – १ टी स्पून.
- साखर – चिमूटभर.
- रेड ऑरेंज फूड कलर – चिमुटभर (पर्यायी).
- तेल – २ ते ३ टे स्पून.
- पाणी -१ पेला.
- काळे मीठ – चिमुटभर.
- मीठ – चवीनुसार.
कृती:
- सर्वप्रथम काजू धुवून १५ ते ३० मिनीटे कोमट पाण्यात भिजवून घ्या.
- मगज बी देखील धुवून भिजवा, मगज बी वापरत नसल्यास वरील साहित्यात काजूचे प्रमाण दुप्पट घ्यावे.
- पनीर धुवून ते १० मिनीटे पाण्यात ठेवा व नंतर त्याचे चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या.पाणी घातल्याने पेस्ट जळणार किंवा पॅन ला चिकटणार नाही व त्याची चव पाण्यात उतरते.
- आले व लसूण समप्रमाणात घेऊन त्याची अगदी मऊ व पातळ अशी पेस्ट बनवून घ्यावी.
- आता भिजवलेले काजू, मगज बी २० मिनीटे मऊ होईपर्यंत उकळून घ्या.
- काजू व मगज बी थंड झाल्यावर व पाण्याचा वापर करून ते वाटून त्याची छान मऊ पेस्ट करून घ्या. ही पेस्ट अतिशय बारीक व मऊ असली पाहिजे.
- एका पॅन मध्ये तेल घालून ते कोमट गरम करा, त्यात सर्व खडे मसाले घाला व आले लसूण पेस्ट घाला व १/२ पेला पाणी घालून ते मिश्रण थोडेसे उकळून घ्या.
- आता त्यात काजू मगज बी पेस्ट घाला, १/४ पेला घाला. व हे मिश्रण ५-१०मिनीटे छान उकळून घ्या. थोडे सुटू लागल्यावर यात एका टोमॅटो ची प्युरी घाला व तेल सुटेपर्यंत शिजू द्या.
- त्यानंतर त्यात गरम मसाला पावडर सोडून सर्व पावडर मसाले घाला, साखर, काळे व साधे मीठ व खायचा रंग घाला.
- सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून पनीर चे तुकडे (क्युब्स) घाला व ग्रेव्ही ३-४ मिनीटे शिजू द्या.
- आता त्यात गरम मसाला पावडर घाला, कसुरी मेथी हातावर चोळून घाला, व्हिनेगर व थोडीशी कोथिंबीर घाला व सर्व व्यवस्थित एकत्र करून व १/२ ते १ मिनीटे शिजवा.
- पनीर बटर मसाला तयार आहे त्यात वरून थोडी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
- तुम्ही ही ग्रेव्ही आधी करून फ्रिज मध्ये साठवून ठेवू शकता असे केल्यास त्यातले मसाले छान मुरतात व ग्रेव्ही ची चव वाढते, शिवाय आयत्यावेळेस पाहूणे आल्यावर ही पनीर घालून ५ मिनिटात भाजी तयार होते.
- ग्रेव्ही फ्रीज मध्ये हवाबंद काच किंवा स्टील च्या डब्ब्यात ठेवा ती १ महिनाभर टिकते.
- ग्रेव्ही चपाती, भात, पराठा, नान सोबत छान लागते.
- ही रेसिपी नक्की करून पाहा व आवडल्यास कंमेंट करून कळवा व लाईक आणि शेअर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा