प्रॉन्स बिर्याणी





प्रॉन्स बिर्याणी ग्रेव्ही
प्रॉन्स बिर्याणी ग्रेव्ही.

साहित्य:
  • मोठे प्रॉन्स सोलून – १ वाटी.
  • बासमती तांदूळ – २+१/२ पेले.
  • दही – १/३ पेला (८० ग्रॅम).
  • मोठे कांदे – २+१/२ ग्रेव्हीसाठी, ३+१/२ तळण्यासाठी.
  • टोमॅटो – १ प्युरीसाठी, १ उभा पातळ चिरून.
मँरिनेशनकरीता:
  • आले पेस्ट १/२ टी स्पून.
  • लसूण पेस्ट - १ टी स्पून.
  • हिरवी मिरची पेस्ट - १/४ टी स्पून
  • घरचा मसाला – २ टी स्पून.
  • काश्मीरी मिरची पावडर – २ टी स्पून.
  • हळद पावडर - १/४ टी स्पून.
  • गरम मसाला पावडर – १ टी स्पून.
  • धणे पावडर – १ टी स्पून.
  • लिंबाचा रस – १/४ लिंबू.
  • मीठ – चवीनुसार (१/२ टी स्पून).

ग्रेव्हीकरीता:
  • कांदे - २+१/२ मोठे उभे चिरून.
  • बटाटे – ४ मध्यम (प्रत्येकी ४ मोठ्या तुकड्यात कापून).
  • टोमॅटो – २ मध्यम (१ प्युरी करिता व १ उभा लांब चिरून).
  • दही – १/३ पेला.
  • आले पेस्ट - १/२ टी स्पून.
  • लसूण पेस्ट - १ टी स्पून.
  • हिरवी मिरची पेस्ट – १/४ टी स्पून.
  • घरचा मसाला – २ टी स्पून.
  • काश्मीरी मिरची पावडर – २ टी स्पून.
  • हळद पावडर - १/४ टी स्पून.
  • गरम मसाला पावडर – १ टी स्पून.
  • धणे पावडर – १ टी स्पून.
  • हिरवी मिरची – १/४ टी स्पून बारीक चिरून.
  • हिरवी वेलची -२.
  • तेजपत्ता – २.
  • लवंग – ४.
  • काळी मिरी – ५.
  • दालचिनी – ३ इंच (दोन तुकडे करून)
  • जिरे १/२ टी स्पून.
  • मीठ – चवीनुसार (१/२ टी स्पून).
  • तेल – १/४ पेला.

तांदूळ शिजवण्यासाठी:
  • पाणी - तांदळाच्या ३ ते ४ पट.
  • आले लसूण हिरवी मिरची पेस्ट चे पाणी – २ ते ३ टे स्पून.
  • हिरवी मिरची – १ दोन तुकडे करुन.
  • हिरवी वेलची – २.
  • बडीशेप – १/४ – टी स्पून.
  • तेजपत्ता – २.
  • दालचिनी – १ इंच.
  • लवंग – ४.
  • काळी मिरी – ५.
  • जिरे – १/४ टी स्पून.
  • तूप – १ चमचा.
  • लिंबाचा रस – १/३ लिंबू.
  • मीठ – चवीनुसार (साधारण २+१/२ टी स्पून).

लेयरसाठी:
  • कांदे – ३+१/२ मोठे, उभे चिरलेले.
  • कोथिंबीर – १ वाटी बारीक चिरलेली.
  • पुदिना – १ टी स्पून.
  • तेल – १/३ पेला.

कृती:
  • सर्वप्रथम मॅरीनेशन चे सर्व साहित्य प्रॉन्स ना लावून २५ ते ३० मिनीटे मॅरीनेट करून घ्या.
  • आता एका कुकर मध्ये १/३ पेला तेल घालून गरम करून घ्या.
  • त्यात  ३+१/२ मोठे, उभे चिरलेले कांदे घालून ब्राउन रंगात तळून घ्या.
  • आता तळलेले कांदे बाजूला काढून घ्या.
  • कुकर मध्ये ग्रेव्ही साठी खडे मसाले घालून घ्या. व  उरलेले उभे चिरलेले कांदे घालून घ्या. व गुलाबी रंगात परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात बटाटे घालून परतवून घ्या, बटाटे थोडे शिजू द्या. त्यानंतर त्यात आले लसूण हिरवी मिरची पेस्ट घाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला, सर्व पावडर मसाले घाला व व्यवस्थित मिक्स करा.
  • आता टोमॅटो चे काप घाला, परतवून टोमॅटो प्युरी घाला व सर्व जिन्नस एकजीव होईपर्यंत परतवून घ्या, टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यात प्रॉन्स घाला, व १ ते २ मिनीटे परतवून घ्या, व दही घाला, सर्व एकत्र चांगले मिक्स करून घ्या व १ ते २ मिनीटे परतवून घ्या. 
  • व त्यात थोडा बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर घाला.
  • बासमती तांदुळ १/२ तास भिजवून घ्या. त्यानंतर एक मोठ्या पातेल्यात तांदूळ शिजवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घालून पाणी उकळून घ्या, आता त्यात भिजवलेले तांदूळ घाला
  • व भात ८५ ते ९० टक्के शिजेपर्यंत उकळा, यास साधारण दीड ते दोन मिनिटे लागतील, आता भातातले सर्व पाणी काढून टाका व फक्त भात वेगळा काढून घ्या.
  • आता कुकर मधली अर्धी ग्रेव्ही बाजूला काढून घ्या, त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना व तळलेला अर्धा कांदा पसरवून घ्या त्यावर अर्धा भात घालून अलगदपणे पसरवा ही तुमची पहिली लेयर तयार झाली.
  • आता उरलेली ग्रेव्ही घालून त्यावर थोडी कोथिंबीर पुदिना थोडा तळलेला कांदा घाला, व उरलेला भात पसरवून घ्या, व उरलेली कोथिंबीर, पुदिना, कांदा घालून घ्या, वरून मध्ये मध्ये केशरी रंगाचे पाणी घाला, उरलेल्या बाजूला हळदीचे पाणी (१ चिमूट हळद + ३ चमचे पाणी) घाला, यामुळे भाताला रंग छान येईल.
  • आता कुकर वर एक कुकर झाकला जाइल एवढ्या मापाचा कागद ठेवा व दोरी वर्तुळाकार फिरवून कागद व्यवस्थित लावून घ्या, आता उरलेला कागद कापून टाका जेणेकरून तो जाळ पकडणार नाही.
  • व त्यावर एक थाळी ठेवा व ६-७ मिनीटे मोठ्या बर्नर वर मध्यम आचेवर ठेवा, व १०-१२ मिनीटे मंद आचेवर ठेवून गॅस बंद करा. त्यानंतर १० ते १२ मिनीटे कुकर न उघडता बिर्याणी रेस्ट वर ठेवा.
  • १० मिनिटांनी बिर्याणी काढून रायता अथवा कोशिंबीर बरोबर सर्व्ह करा.

सर्व्ह – ५ ते ६ जणांसाठी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत