चवळीची पालेभाजी
लो कॅलोरी, फायबर युक्त, चविष्ट अगदी कमी साहित्यात कमी वेळात व बनवायला सोपी अशी पालेभाजी.
साहित्य:
- चवळीची पालेभाजी -१ जुडी.
- लसूण पाकळ्या - १०-१२.
- हिरव्या मिरच्या -१-२ लहान.
- मीठ - चवीनुसार.
- तेल - १ टी स्पून.
कृती:
- चवळीची पाने अगदी कमी देठा सोबत निवडून घ्या व स्वछ धुवून घ्या.
- हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.
- एका कढईत तेल तापवून घ्या.
- त्यात हिरवी मिरची व लसणाचा ठेचा घाला एकदा परतून लगेचच भाजी घाला व चांगली परतून घ्या.
- आता झाकण ठेवून १-२ मिनीटे शिजवा एकदा परतून आणखी १-२ मिनिटे शिजवा
- आता मीठ घालुन भाजी परतून घ्या. व पुन्हा झाकण ठेवून १ मिनीटे शिजवा.
- भाजी तयार आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते.
टीप: पालेभाजी शिजल्यावर आळुन कमी होते म्हणून पालेभाजी करताना मीठ नेहमी शेवटी टाकावे म्हणजे भाजी खारट होत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा