पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोडक्याची चटणी (शिराळ्याची चटणी)

इमेज
  साहित्य  : दोडका - २५० ग्रॅम. हिरव्या मिरच्या – ३ ते ४. लसूण – ८ ते ९ पाकळ्या. राई - चिमूटभर. जिरे – चिमूटभर. हळद – १/४ टी स्पून. हिंग – १/४ टी स्पून. तेल – २ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती  : कोवळे दोडके स्वछ धुवून त्याच्या साली काढून टाकुन अगदी बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची व लसणाचा जाड ठेचा वाटून घ्या. आता एका कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात राई घाला ती तडतडली की जिरे घाला, आता हिरवी मिरची व लसूण चा जाडसर ठेचा घाला ती किंचित परतवून त्यात  हळद व हिंग घाला व ते मिक्स करुन त्यात बारीक चिरलेला दोडका घाला, सर्व मिश्रण चांगले परतवून घ्या. व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून ३-४ मिनीटे शिजू द्या व अध्ये मध्ये परतत राहा. आता झाकण काढून पाणी पूर्ण आटेपर्यंत चटणी परतत राहा.  पाणी आटून चटणी कोरडी झाली की गॅस बंद करा. दोडक्याची झटपट, चविष्ट चटणी तयार आहे नक्की करून पाहा, व आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

उपवासाचे धिरडे.

इमेज
  राजगिरा पीठ – १ सुक्क्या खोबऱ्याची पावडर – २ टी स्पून. हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. धने जिरे पावडर – १/४ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. बारीक चिरलेली कोथिंबीर - १/२ टी स्पून. पाणी – १/३ पेला. तेल – १ ते २ टीस्पून. काळे मीठ – १/४ टी स्पून. कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि इडलीच्या पीठाएवढे घट्ट असावे. एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे त तेल किंवा तूप गरम करा व गॅस तीव्र आचेवर ठेवून वरील मिश्रण फ्राय पॅन वर गोलाकार पसरा. धिरडे थोडे जाडच ठेवावे, आता झाकण ठेवून ते २ ते ३ मिनीटे छान खरपूस भाजून घ्या आता झाकण काढून आणखी अर्धा ते एक मिनिट शिजू द्या व छान कुरकुरीत भाजू द्या, आता दुसरी बाजू देखील अशाचप्रकारे भाजून घ्या. उपवासाचे धिरडे तयार आहेत.

उपवासाचे काकडीचे थालीपीठ

इमेज
साहित्य : काकडीचा किस -१/२ वाटी. राजगिरा पीठ - १/२ वाटी. हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. धने जिरे पावडर – १/४ टी स्पून. जिरे – चिमुटभर. साखर – १/२ टी स्पून. काळे मनुके – १ चमचा. पाणी – आवश्यकतेनुसार. तूप – १ ते २ टीस्पून. काळे मीठ – चिमूटभर. मीठ – चवीनुसार. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि चपाती चे पीठ मळतो त्यापेक्षा अगदी पातळ असावे. एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे तूप सोडा, व थालीपीठाचे पीठ फ्राय पॅन वर गोलाकार पसरवून थालीपीठ थापा, जास्त जाड नको, आता ते छान खरपूस भाजून घ्या व अर्धा ते एक मिनिट शिजू द्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या. टीप : हे थालीपीठ गोड दही किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

व्हेजिटेबल मसाला मॅगी

इमेज
साहित्य : मसाला मॅगी – २. हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन – ३. कांदे उभे चिरुन – २ मध्यम. टोमॅटो उभा चिरुन – १. शिमला मिरची लांब चिरुन– १/४ वाटी. कोबी लांब चिरुन – १/४ वाटी. गाजर बारीक चिरुन – १ टी स्पून. हिरवी मिरची मध्ये उभ्या चिरुन – ३. कोथिंबीर बारीक चिरून – २ टी स्पून. लसूण पाकळ्या बारीक चिरून – ७ ते ८. आले– १/२ इंच. व्हिनेगर – १/४ टी स्पून. काळी मिरी क्रश – १/४ टी स्पून. साखर – चिमूटभर. तेल – ३ ते ४ टे स्पून. मॅगी मसाला – २. काळे मीठ – चिमूटभर. कृती : एका कढईत तेल थोडे गरम करून घ्या, त्यात जिरे घाला. त्यात बरीक चिरलेला लसूण व किसून किंवा लांब पातळ चिरलेले आले घाला. लसूण व आले थोडे पिवळसर रंगावर परतून घ्या व मिरच्या घाला व परता. आता यात कोबी घालुन १ ते २ मिनीटे परतून घ्या. आता शिमला मिरची, गाजर घालून ती देखील १ ते २ मिनीटे परतून घ्या सर्व भाज्या निम्म्या परतून झाल्या की त्यात कांदे घालून ते मऊ गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात कोथिंबीर, काळे मीठ, मॅगी मसाला, साखर घालून थोडे परतून घ्या. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून ते पूर्णपणे मऊ व गाळ होईपर्यंत झाकण ठेवून शिजू द्या. एका टोप...

पनीर चिली

इमेज
साहित्य : पनीर – १०० ग्रॅम. हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन – ४. कांदे लांब चिरुन – १+१/२ वाटी. कांद्याची पात बारीक चिरुन – २ टे स्पून. शिमला मिरची लांब चिरुन– १/२ वाटी. कोबी लांब चिरुन – १/४ वाटी. लसूण पाकळ्या बारीक चिरून – ७ ते ८. आले– १/२ इंच. आले लसूण ची पातळ पेस्ट – २ टे स्पून. सोया सॉस- २ टी स्पून. रेड चिली सॉस – २ टी स्पून. व्हिनेगर – १/२ टी स्पून. शेजवान चटणी – २ टी स्पून. काळी मिरी क्रश – १/२ टी स्पून. साखर – चिमूटभर. तेल – २ ते ३ टे स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : एक नॉनस्टिक पॅन चांगला गरम तापवून घ्या, त्यावर थोडे तेल घालून ते चांगले तापवून घ्या,  त्यात बरीक चिरलेला लसूण घाला, व पातळ लांब काड्यांमध्ये कापलेले आले घाला, तेल खूप गरम तापले की फोडणी उडते त्याची सावधानता बाळगा. लसूण व आले थोडे पिवळसर रंगावर परतून घ्या व मिरच्या घाला व परता आता त्यात बारीक चिरलेली कांद्याची पात घालून छान परता. आता यात कोबी घालुन १ ते २ मिनीटे परतून घ्या. आता शिमला मिरची घालून ती देखील १ ते २ मिनीटे परतून घ्या सर्व भाज्या निम्म्या परतून झाल्या की त्यात कांदे घाला. ह्या सर्व भाज्या गॅस तीव्र आचेवर ठेव...

दोडक्याच्या सालीची चटणी.

इमेज
दोडक्याच्या सालीत खूप जीवनसत्त्वे असतात, ती फेकून न देता त्याची पौष्टिक व चविष्ट चटणी करता येते. चला तर मग कृती पाहूयात. साहित्य : दोडक्याच्या साली – २ वाट्या. हिरव्या मिरच्या – ४. लसूण – १/२ गड्डी. जिरे – चिमूटभर. हळद – १/४ टी स्पून. हिंग – १/४ टी स्पून. तीळ – १ चमचा. तेल – ३ चमचे. मीठ – चवीनुसार. कृती : कोवळे दोडके स्वछ धुवून त्याच्या साली छिलून घ्याव्यात. आता या साली परत धुवून त्यात मिरच्या, लसूण आणि किंचित मीठ घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्याव्यात. मिक्सर थांबून थांबून चालवावा म्हणजे चटणी झटकन बारीक होणार नाही. आता एका कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात तीळ घालून थोडे परतून घ्या, तीळ उडू लागतील त्यामुळे त्यावर झाकण ठेवू शकता. तीळ चांगले तडतडले तांबूस रंगाचे झाले की त्यात थोडे जिरे घाला व परतून मिक्सर ला वाटलेली चटणी घाला, हळद, हिंग व मीठ घाला व सगळे छान ,२-३ मिनीटे परतून घ्या. ही चटणी छान कुरकुरीत होईपर्यंत परतावी. आवश्यक वाटल्यास झाकण ठेवावे व मध्ये मध्ये परतत राहावे गरज असल्यास मध्ये थोडे तेल घालावे. ही चटणी पूर्णपणे शिजवायला ५ ते ७ मिनीटे लागतात. तेव्हा ही झटपट चविष्ट चटणी नक...

गव्हाचे गोड धिरडे

इमेज
सणासुदीला किंवा पाहुणे आले की झटपट परंतु गोडाचा बेत करायचा असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात आमरस व त्यासोबत असे धिरडे केले जातात. आमरस देखील गोड व वेलची युक्त असल्याने गव्हाच्या पिठात थोडेसे ज्वारीचे पीठ मिसळून मीठ व पाणी घालून अगदी चविष्ट धिरडे होतात. परंतु ह्याच धिरड्यात थोडासा बदल करून छान नाश्ता करता येतो तो म्हणजे गव्हाचे धिरडे. गव्हाचे गोड धिरडे म्हणजे हा अगदी सोपा, पटकन, कमी साहित्यात होणारा नाश्ता, तसेच लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ. चला तर मग पटकन साहित्य आणि कृती पाहुयात. साहित्य : गव्हाचे पीठ – १ वाटी. दूध - १/२ वाटी. अंडं– १ (पर्यायी). गूळ – १/२ वाटी. वेलची – ४. जायफळ पावडर – चिमूटभर. तूप/तेल – २ ते ३ टी स्पून. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या, व साधारण उत्तप्पा साठी करतो तसे पातळ घोळ बनवून घ्या. एक नॉनस्टिक पॅन चांगला तापवून घ्या, त्यावर तूप घालून ते किंचित गरम होऊ द्या. गॅस तीव्र आचेवर ठेवून त्यावर हे मिश्रण ओता व त्याला मोठा चमचा किंवा वाटीच्या साहाय्याने गोल आकार द्या. गॅस मंद आचेवर ठेवून १ मिनिटाकरता ठेवा व नंतर झाकण ठेवून आणखी १ ते २ मिनीटे शिजू द्या व ...

वांग्याचं भरीत

इमेज
साहित्य : मोठे काळे वांगे – १. लसूण – १ गड्डी (१२ ते १५ पाकळ्या). हिरव्या मिरच्या - ४. आले – १/४ इंच. जिरे – १/४ टी स्पून. राई – १/४ टी स्पून. हळद -१/४ टी स्पून. हिंग – १/४ टी स्पून. कडीपत्ता – ६ ते ७ पाने. तेल – ५ ते ६ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : वांगं गॅस वर ठेवून सर्व बाजूनी साल पूर्ण काळी होऊन पापुद्रे निघेपर्यंत भाजून घ्यावे. आता ते थंड होऊ द्या. लसूण, आले हिरवी मिरचीचा खरखरीत जाडसर ठेचा मिक्सर ला वाटून घ्या. वांगं थंड झाल्यावर त्याची साल काढून वरचे वर पाण्याने धुवून घ्या व मधून कापून घ्या. आता एक तवा गरम करून त्यावर तेल घाला, तयार राई घालून तडतडू द्या त्यानंतर जिरे घालून परतून घ्या व कडीपत्ता थोडा चुरडून घाला. त्यानंतर मिक्सर मध्ये वाटलेलं ठेचा घालून हळद व हिंग घाला आणि १ मिनिटं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या. आता त्यात वांग घाला व ते तव्यावरच कुस्करून घ्या. मीठ घालून सर्व मिश्रण एक ते दीड मिनिटे चांगले परतवून घ्या.  व झाकण ठेवून दीड ते २ मिनीटे शिजू द्या परंतु मध्ये मध्ये परतत राहावे जेणेकरून भाजी तव्यावर चिकटणार नाही. आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात आणखी तेल घालू शक...

मेथीची भाजी

इमेज
मेथीची भाजी ही अत्यंत पौष्टिक असते यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, जीवनसत्त्वे व कॅल्शिअम, मॅग्नेशियम, लोह यांसारखी खनिजे असतात. तसेच यातील तंतुमय पदार्थ आपला कोठा स्वछ राखण्यास मदत करतात. म्हणून रोजच्या आहारात याचा समावेश करणे अत्यंत फायद्याचे ठरते. ही भाजी बाळंतिणीसाठी अतिशय उपयुक्त आहे, खालील कृतीत मिरची चा वापर कमी करून पातळ भाजी करून बाळंतिणीला देता येते. साहित्य : मेथीची जुडी – १. शेंगदाणे – १/२ वाटी. हिरव्या मिरच्या -  ३ ते ४. लसूण – ७ ते ८ पाकळ्या. जिरे – चिमूटभर. मीठ - चवीनुसार. तेल – ४ ते ५ टी स्पून. कृती : मेथीची भाजी पाने आणि पानालगत कोवळ्या बारीक कड्यांसाहित निवडून घ्या. ही भाजी एका मोठ्या पातेल्यात कोमट पाणी घालून त्यात टाका व थोडी अलगद ढवळा. व ती पातेल्यातच राहू द्या त्यामुळे भाजीतले माती व जंतू खाली तळाला जातात शिवाय भाजीचा कडवटपणा कमी होतो आता शेंगदाणे धुवून ती मंद आचेवर तव्यावर खरपूस भाजून घ्या, ह्यास साधारण ६ ते ७ मिनीटे लागतील. आता भाजलेले शेंगदाणे थोडे कोमट झाले की त्यावर वाटीच्या साहाय्याने दाब देऊन साले काढून घ्या. आता मिक्सर मध्ये हे शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जिर...

साबुदाणा मूगडाळ पायसम (खीर)

इमेज
साहित्य: साबुदाणा - १/४ वाटी. मूगडाळ - १/२ वाटी. गूळ – १ वाटी. नारळाचे दूध – १ वाटी ( नारळाचे दूध नसल्यास तुम्ही गायीचे दूध देखील वापरू शकता). काजू बदामाचे तुकडे – १/४ वाटी. मनुके – २ चमचे. खारीकचे तुकडे – १ चमचा. सुक्क्या खोबऱ्याचे तुकडे – १ चमचा. वेलची -४. तूप – २ टी स्पून. कृती : साबुदाणा धुवुन त्यात साबुदाण्याच्यावर १/४ इंच बोट बुडेल इतके पाणी घालून रात्रभर भिजवावे. साबुदाणा व मूगडाळ वेगवेगळ्या भांड्यात कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून ड्रायफ्रूटस, खारीक, खोबरयाचे चे तुकडे घालून किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर त्यात साबुदाणा व थोडे पाणी घालून शिजवून घ्या. मध्ये मध्ये थोडे ढवळत राहा. २ ते ३  मिनिटाने शिजवलेली मूगडाळ घाला. १-२ मिनिटांनी त्यात दूध घाला व मंद आचेवर साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत शिजवा, त्यांनतर त्यात गूळ व वेलची पावडर घालून उकळी येईपर्यंत शिजवा. तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ करा, आवश्यक असल्यास तुम्ही यात आणखी दूध घालू शकता. खीर तयार आहे तुम्ही यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटस घालून सजवू शकता.

प्रॉन्स मसाला

इमेज
साहीत्य : मोठे प्रॉन्स सोलून – १ वाटी. कांदे - ४ मोठे. आले लसूण पेस्ट – १ टे स्पून. लाल तिखट (घरचा मसाला) – १ टी स्पून. गरम मसाला – १/४ टी स्पून. हिरव्या मिरच्या – ३ उभ्या चिरुन. कोथिंबीर बारीक चिरून – १/२ वाटी. कोकम – १,२. मीठ – चवीनुसार. तेल - १ टे स्पून. कृती : सर्वप्रथम तव्यावर तेल गरम करून घ्या त्यात आले लसूण पेस्ट घालून थोडीशी पिवळ्या रंगावर परतवून घ्या. आता त्यात कांदे बारीक चिरून घाला, व हिरव्या मिरच्या घाला, हे कांदे अगदी मऊ होईपर्यंत तपकिरी रंगावर छान भाजून घ्या, गॅस ची आच मंद असावी. कांदे भाजून निम्मे झाले की त्यात घरचा मसाला घाला व छान दिड ते दोन मिनिटे परतवून घ्या. आता त्यात प्रॉन्स घाला व सर्व मिश्रण चांगले परतवून घ्या, व त्यात थोडी कोथिंबीर बारीक चिरून घाला. एक मिनिटानंतर ते व्यवस्थित फिरवुन त्यात कोकम चे दोन तुकडे करून घाला,  व एक मिनिट शिजवा. प्रॉन्स अर्धवर्तुळाकार झाले म्हणजे ते शिजले, मोठे प्रॉन्स शिजायला साधारण दोन ते तीन मिनीटे लागतात. जास्त शिजवल्यास ते चिवट होतात. आता त्यात गरम मसाला घाला व छान एकत्र करून घ्या उरलेली कोथिंबीर घाला व एकत्र करून १ मिनिटांनी गॅस...