प्रॉन्स मसाला



साहीत्य:
  • मोठे प्रॉन्स सोलून – १ वाटी.
  • कांदे - ४ मोठे.
  • आले लसूण पेस्ट – १ टे स्पून.
  • लाल तिखट (घरचा मसाला) – १ टी स्पून.
  • गरम मसाला – १/४ टी स्पून.
  • हिरव्या मिरच्या – ३ उभ्या चिरुन.
  • कोथिंबीर बारीक चिरून – १/२ वाटी.
  • कोकम – १,२.
  • मीठ – चवीनुसार.
  • तेल - १ टे स्पून.
कृती:
  • सर्वप्रथम तव्यावर तेल गरम करून घ्या त्यात आले लसूण पेस्ट घालून थोडीशी पिवळ्या रंगावर परतवून घ्या.
  • आता त्यात कांदे बारीक चिरून घाला, व हिरव्या मिरच्या घाला, हे कांदे अगदी मऊ होईपर्यंत तपकिरी रंगावर छान भाजून घ्या, गॅस ची आच मंद असावी.
  • कांदे भाजून निम्मे झाले की त्यात घरचा मसाला घाला व छान दिड ते दोन मिनिटे परतवून घ्या.
  • आता त्यात प्रॉन्स घाला व सर्व मिश्रण चांगले परतवून घ्या, व त्यात थोडी कोथिंबीर बारीक चिरून घाला.
  • एक मिनिटानंतर ते व्यवस्थित फिरवुन त्यात कोकम चे दोन तुकडे करून घाला,  व एक मिनिट शिजवा.
  • प्रॉन्स अर्धवर्तुळाकार झाले म्हणजे ते शिजले, मोठे प्रॉन्स शिजायला साधारण दोन ते तीन मिनीटे लागतात. जास्त शिजवल्यास ते चिवट होतात.
  • आता त्यात गरम मसाला घाला व छान एकत्र करून घ्या उरलेली कोथिंबीर घाला व एकत्र करून १ मिनिटांनी गॅस बंद करा.
  • प्रॉन्स मसाला तयार आहे.
  • ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा, आणि आवडल्यास कंमेंट आणि शेअर करा.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत