व्हेजिटेबल मसाला मॅगी

साहित्य:

  • मसाला मॅगी – २.
  • हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन – ३.
  • कांदे उभे चिरुन – २ मध्यम.
  • टोमॅटो उभा चिरुन – १.
  • शिमला मिरची लांब चिरुन– १/४ वाटी.
  • कोबी लांब चिरुन – १/४ वाटी.
  • गाजर बारीक चिरुन – १ टी स्पून.
  • हिरवी मिरची मध्ये उभ्या चिरुन – ३.
  • कोथिंबीर बारीक चिरून – २ टी स्पून.
  • लसूण पाकळ्या बारीक चिरून – ७ ते ८.
  • आले– १/२ इंच.
  • व्हिनेगर – १/४ टी स्पून.
  • काळी मिरी क्रश – १/४ टी स्पून.
  • साखर – चिमूटभर.
  • तेल – ३ ते ४ टे स्पून.
  • मॅगी मसाला – २.
  • काळे मीठ – चिमूटभर.

कृती:

  • एका कढईत तेल थोडे गरम करून घ्या, त्यात जिरे घाला.
  • त्यात बरीक चिरलेला लसूण व किसून किंवा लांब पातळ चिरलेले आले घाला.
  • लसूण व आले थोडे पिवळसर रंगावर परतून घ्या व मिरच्या घाला व परता.
  • आता यात कोबी घालुन १ ते २ मिनीटे परतून घ्या.
  • आता शिमला मिरची, गाजर घालून ती देखील १ ते २ मिनीटे परतून घ्या सर्व भाज्या निम्म्या परतून झाल्या की त्यात कांदे घालून ते मऊ गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.
  • आता त्यात कोथिंबीर, काळे मीठ, मॅगी मसाला, साखर घालून थोडे परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात टोमॅटो घालून ते पूर्णपणे मऊ व गाळ होईपर्यंत झाकण ठेवून शिजू द्या.
  • एका टोपामध्ये एक ते दीड ग्लास पाणी चांगले उकळा. त्यात दोन मॅगी मधून उभे दोन ते तीन तुकडे करून घाला व गॅस तीव्र आचेवर ठेवून नीट एकत्र करून घ्या.
  • आता त्यात १ टी स्पून तेल घाला, व मॅगी ७० ते ८० टक्के शिजवून घ्या. आता मॅगी एका चाळणीत ओतून त्यातील सर्व पाणी काढून टाका व ती नळाखाली धरून त्यावर मॅगी सर्वबाजुनी पूर्णपणे थंड होईल इतके पाणी सोडा. 
  • आता पाणी पूर्णपणे गाळून ती तयार केलेल्या मसाल्यात घाला, मसाला व मॅगी चांगली एकत्र करून घ्या. व मॅगीला सर्वबाजूने मसाला लागेपर्यंत परतून घ्या.
  • आता गॅस बंद करून मॅगी काही सेकंदासाठी झाकून ठेवा व गरम गरम सर्व्ह करा.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत