पोस्ट्स

वांग्याचं भरीत

इमेज
साहित्य : मोठे काळे वांगे – १. लसूण – १ गड्डी (१२ ते १५ पाकळ्या). हिरव्या मिरच्या - ४. आले – १/४ इंच. जिरे – १/४ टी स्पून. राई – १/४ टी स्पून. हळद -१/४ टी स्पून. हिंग – १/४ टी स्पून. कडीपत्ता – ६ ते ७ पाने. तेल – ५ ते ६ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : वांगं गॅस वर ठेवून सर्व बाजूनी साल पूर्ण काळी होऊन पापुद्रे निघेपर्यंत भाजून घ्यावे. आता ते थंड होऊ द्या. लसूण, आले हिरवी मिरचीचा खरखरीत जाडसर ठेचा मिक्सर ला वाटून घ्या. वांगं थंड झाल्यावर त्याची साल काढून वरचे वर पाण्याने धुवून घ्या व मधून कापून घ्या. आता एक तवा गरम करून त्यावर तेल घाला, तयार राई घालून तडतडू द्या त्यानंतर जिरे घालून परतून घ्या व कडीपत्ता थोडा चुरडून घाला. त्यानंतर मिक्सर मध्ये वाटलेलं ठेचा घालून हळद व हिंग घाला आणि १ मिनिटं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या. आता त्यात वांग घाला व ते तव्यावरच कुस्करून घ्या. मीठ घालून सर्व मिश्रण एक ते दीड मिनिटे चांगले परतवून घ्या.  व झाकण ठेवून दीड ते २ मिनीटे शिजू द्या परंतु मध्ये मध्ये परतत राहावे जेणेकरून भाजी तव्यावर चिकटणार नाही. आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात आणखी तेल घालू शक...

मेथीची भाजी

इमेज
मेथीची भाजी ही अत्यंत पौष्टिक असते यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, जीवनसत्त्वे व कॅल्शिअम, मॅग्नेशियम, लोह यांसारखी खनिजे असतात. तसेच यातील तंतुमय पदार्थ आपला कोठा स्वछ राखण्यास मदत करतात. म्हणून रोजच्या आहारात याचा समावेश करणे अत्यंत फायद्याचे ठरते. ही भाजी बाळंतिणीसाठी अतिशय उपयुक्त आहे, खालील कृतीत मिरची चा वापर कमी करून पातळ भाजी करून बाळंतिणीला देता येते. साहित्य : मेथीची जुडी – १. शेंगदाणे – १/२ वाटी. हिरव्या मिरच्या -  ३ ते ४. लसूण – ७ ते ८ पाकळ्या. जिरे – चिमूटभर. मीठ - चवीनुसार. तेल – ४ ते ५ टी स्पून. कृती : मेथीची भाजी पाने आणि पानालगत कोवळ्या बारीक कड्यांसाहित निवडून घ्या. ही भाजी एका मोठ्या पातेल्यात कोमट पाणी घालून त्यात टाका व थोडी अलगद ढवळा. व ती पातेल्यातच राहू द्या त्यामुळे भाजीतले माती व जंतू खाली तळाला जातात शिवाय भाजीचा कडवटपणा कमी होतो आता शेंगदाणे धुवून ती मंद आचेवर तव्यावर खरपूस भाजून घ्या, ह्यास साधारण ६ ते ७ मिनीटे लागतील. आता भाजलेले शेंगदाणे थोडे कोमट झाले की त्यावर वाटीच्या साहाय्याने दाब देऊन साले काढून घ्या. आता मिक्सर मध्ये हे शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जिर...

साबुदाणा मूगडाळ पायसम (खीर)

इमेज
साहित्य: साबुदाणा - १/४ वाटी. मूगडाळ - १/२ वाटी. गूळ – १ वाटी. नारळाचे दूध – १ वाटी ( नारळाचे दूध नसल्यास तुम्ही गायीचे दूध देखील वापरू शकता). काजू बदामाचे तुकडे – १/४ वाटी. मनुके – २ चमचे. खारीकचे तुकडे – १ चमचा. सुक्क्या खोबऱ्याचे तुकडे – १ चमचा. वेलची -४. तूप – २ टी स्पून. कृती : साबुदाणा धुवुन त्यात साबुदाण्याच्यावर १/४ इंच बोट बुडेल इतके पाणी घालून रात्रभर भिजवावे. साबुदाणा व मूगडाळ वेगवेगळ्या भांड्यात कुकर मध्ये दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप घालून ड्रायफ्रूटस, खारीक, खोबरयाचे चे तुकडे घालून किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर त्यात साबुदाणा व थोडे पाणी घालून शिजवून घ्या. मध्ये मध्ये थोडे ढवळत राहा. २ ते ३  मिनिटाने शिजवलेली मूगडाळ घाला. १-२ मिनिटांनी त्यात दूध घाला व मंद आचेवर साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत शिजवा, त्यांनतर त्यात गूळ व वेलची पावडर घालून उकळी येईपर्यंत शिजवा. तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ करा, आवश्यक असल्यास तुम्ही यात आणखी दूध घालू शकता. खीर तयार आहे तुम्ही यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटस घालून सजवू शकता.

प्रॉन्स मसाला

इमेज
साहीत्य : मोठे प्रॉन्स सोलून – १ वाटी. कांदे - ४ मोठे. आले लसूण पेस्ट – १ टे स्पून. लाल तिखट (घरचा मसाला) – १ टी स्पून. गरम मसाला – १/४ टी स्पून. हिरव्या मिरच्या – ३ उभ्या चिरुन. कोथिंबीर बारीक चिरून – १/२ वाटी. कोकम – १,२. मीठ – चवीनुसार. तेल - १ टे स्पून. कृती : सर्वप्रथम तव्यावर तेल गरम करून घ्या त्यात आले लसूण पेस्ट घालून थोडीशी पिवळ्या रंगावर परतवून घ्या. आता त्यात कांदे बारीक चिरून घाला, व हिरव्या मिरच्या घाला, हे कांदे अगदी मऊ होईपर्यंत तपकिरी रंगावर छान भाजून घ्या, गॅस ची आच मंद असावी. कांदे भाजून निम्मे झाले की त्यात घरचा मसाला घाला व छान दिड ते दोन मिनिटे परतवून घ्या. आता त्यात प्रॉन्स घाला व सर्व मिश्रण चांगले परतवून घ्या, व त्यात थोडी कोथिंबीर बारीक चिरून घाला. एक मिनिटानंतर ते व्यवस्थित फिरवुन त्यात कोकम चे दोन तुकडे करून घाला,  व एक मिनिट शिजवा. प्रॉन्स अर्धवर्तुळाकार झाले म्हणजे ते शिजले, मोठे प्रॉन्स शिजायला साधारण दोन ते तीन मिनीटे लागतात. जास्त शिजवल्यास ते चिवट होतात. आता त्यात गरम मसाला घाला व छान एकत्र करून घ्या उरलेली कोथिंबीर घाला व एकत्र करून १ मिनिटांनी गॅस...

बटर पनीर मसाला

इमेज
साहित्य : काजू – १/२ पेला. मगज बी – १/४ पेला (पर्यायी). पनीर – १०० ग्रॅम. टोमॅटो – १ मोठा. कोथिंबीर बारीक चिरून – २ टी स्पून. आले लसूण पेस्ट – १ टी स्पून. तमालपत्र (तेजपत्ता) – २-३. लवंग -२. काळी मिरी- ४. दालचिनी- २ इंच. वेलदोडा – १. हिरवी वेलची – ४. चक्रीफुल – १. लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून. धने जिरे पावडर – २ टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर – १ टीस्पून. गरम मसाला पावडर – १/२ टी स्पून. हळद – १/४ टी स्पून. कसुरी मेथी – १ टी स्पून. व्हिनेगर – १ टी स्पून. साखर – चिमूटभर. रेड ऑरेंज फूड कलर – चिमुटभर (पर्यायी). तेल – २ ते ३ टे स्पून. पाणी -१ पेला. काळे मीठ – चिमुटभर. मीठ – चवीनुसार. कृती : सर्वप्रथम काजू धुवून १५ ते ३० मिनीटे कोमट पाण्यात भिजवून घ्या. मगज बी देखील धुवून भिजवा, मगज बी वापरत नसल्यास वरील साहित्यात काजूचे प्रमाण दुप्पट घ्यावे. पनीर धुवून ते १० मिनीटे पाण्यात ठेवा व नंतर त्याचे चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या.पाणी घातल्याने पेस्ट जळणार किंवा पॅन ला चिकटणार नाही व त्याची चव पाण्यात उतरते. आले व लसूण समप्रमाणात घेऊन त्याची अगदी मऊ व पातळ अशी पेस्ट बनवून घ्यावी. आता भिजवलेले काज...

काकडीचे थालीपीठ

इमेज
साहित्य : काकडी – ३ मध्यम. हिरवी मिरची - २ बारीक चिरून. कोथिंबीर – १ टी स्पून बारीक चिरून. आले लसूण पेस्ट – १ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. मिरची पावडर – १/४ टी स्पून. गरम मसाला – १/२ टी स्पून. धने जिरे पावडर - १ टी स्पून. हिंग – चिमूटभर. हळद  – १/४ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. ओवा – १/४ टी स्पून. साखर – १/२ टी स्पून. काळे मीठ – चिमूटभर मीठ – चवीनुसार. पाणी – आवश्यकतेनुसार. गव्हाचं पीठ – १+ १/४ पेला. चण्याच्या डाळीचं पीठ – १/४ पेला. तांदळाचे पीठ – १/२ पेला  ज्वारीचं पीठ – ३ टी स्पून. तेल – ४ ते ५ टीस्पून. कृती : एका थाळीत काकडी किसून घ्या, त्यात वरील इतर सर्व जिन्नस एकत्र करा,  आता पाणी न वापरता भजीच्या मिश्रणासारखे पातळ मिश्रण तयार करा, मिश्रण घट्ट झाले तरच पाण्याचा वापर करावा अन्यथा टाळावा. आता एक फ्राय पॅन गरम करून घ्या. त्यात १ टी स्पून तेल घालून थोडे गरम करा, आता गॅस तीव्र आचेवर ठेवून थालिपीठाचे पीठ घाला, व ते गोल आकारात पसरवा, थालिपीठ अति पातळ तसेच जास्त जाड नसावे,  व झाकण न ठेवता, एक ते दोन मिनिटे शिजवून ते पलटून घ्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या....

चटपटीत बीट गाजर सॅलड

इमेज
सॅलड ऐकलं की खूप बोरिंग पदार्थ डोळ्यासमोर येतो. परंतु याच सॅलडला तुम्ही योग्यपद्धतीने ड्रेसिंग केलंत आणि योग्य पदार्थांच कॉम्बिनशन केलंत तर त्याची चव वाढतेच व अगदी रोज खायला ही हा पदार्थ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. साहित्य: बीट- १/२ लहान. काकडी -१/२ लहान. गाजर - १/२ लहान. टोमॅटो  - १ मध्यम. बारिक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून. बारीक चिरलेली हिरवी मिरची – १/४ टी स्पून (पर्यायी). धने जिरे पावडर - १/४ टी स्पून. काळी मिरी पावडर - १ चिमूटभर. काळे मीठ – चिमूटभर. लिंबाचा रस– १/४ टी स्पून. (आवश्यक) मीठ - चवीनुसार. मंगलोरिअन फरसाण - १ टे स्पून. कृती : वरील सर्व भाज्या अगदी बारीक आकारात चिरुन घ्या. उरलेले साहित्य त्यात घालून हलक्या हाताने मिक्स करा. अगदी झटपट सॅलड तयार झाले. नक्की करून पाहा आणि कंमेंट करून प्रतिक्रिया कळवा तसेच रेसिपी देखील इतरांना शेअर करा. टीप : मंगलोरिअन फरसाण उपलब्ध नसल्यास तुम्ही फक्त वरील इतर साहित्य वापरून देखील हे सलाड करू शकता, परंतु हे फरसाण सॅलड ची चव अणखी वाढवते.