पोस्ट्स

बटर पनीर मसाला

इमेज
साहित्य : काजू – १/२ पेला. मगज बी – १/४ पेला (पर्यायी). पनीर – १०० ग्रॅम. टोमॅटो – १ मोठा. कोथिंबीर बारीक चिरून – २ टी स्पून. आले लसूण पेस्ट – १ टी स्पून. तमालपत्र (तेजपत्ता) – २-३. लवंग -२. काळी मिरी- ४. दालचिनी- २ इंच. वेलदोडा – १. हिरवी वेलची – ४. चक्रीफुल – १. लाल मिरची पावडर – १/४ टी स्पून. धने जिरे पावडर – २ टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर – १ टीस्पून. गरम मसाला पावडर – १/२ टी स्पून. हळद – १/४ टी स्पून. कसुरी मेथी – १ टी स्पून. व्हिनेगर – १ टी स्पून. साखर – चिमूटभर. रेड ऑरेंज फूड कलर – चिमुटभर (पर्यायी). तेल – २ ते ३ टे स्पून. पाणी -१ पेला. काळे मीठ – चिमुटभर. मीठ – चवीनुसार. कृती : सर्वप्रथम काजू धुवून १५ ते ३० मिनीटे कोमट पाण्यात भिजवून घ्या. मगज बी देखील धुवून भिजवा, मगज बी वापरत नसल्यास वरील साहित्यात काजूचे प्रमाण दुप्पट घ्यावे. पनीर धुवून ते १० मिनीटे पाण्यात ठेवा व नंतर त्याचे चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्या.पाणी घातल्याने पेस्ट जळणार किंवा पॅन ला चिकटणार नाही व त्याची चव पाण्यात उतरते. आले व लसूण समप्रमाणात घेऊन त्याची अगदी मऊ व पातळ अशी पेस्ट बनवून घ्यावी. आता भिजवलेले काज...

काकडीचे थालीपीठ

इमेज
साहित्य : काकडी – ३ मध्यम. हिरवी मिरची - २ बारीक चिरून. कोथिंबीर – १ टी स्पून बारीक चिरून. आले लसूण पेस्ट – १ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. मिरची पावडर – १/४ टी स्पून. गरम मसाला – १/२ टी स्पून. धने जिरे पावडर - १ टी स्पून. हिंग – चिमूटभर. हळद  – १/४ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. ओवा – १/४ टी स्पून. साखर – १/२ टी स्पून. काळे मीठ – चिमूटभर मीठ – चवीनुसार. पाणी – आवश्यकतेनुसार. गव्हाचं पीठ – १+ १/४ पेला. चण्याच्या डाळीचं पीठ – १/४ पेला. तांदळाचे पीठ – १/२ पेला  ज्वारीचं पीठ – ३ टी स्पून. तेल – ४ ते ५ टीस्पून. कृती : एका थाळीत काकडी किसून घ्या, त्यात वरील इतर सर्व जिन्नस एकत्र करा,  आता पाणी न वापरता भजीच्या मिश्रणासारखे पातळ मिश्रण तयार करा, मिश्रण घट्ट झाले तरच पाण्याचा वापर करावा अन्यथा टाळावा. आता एक फ्राय पॅन गरम करून घ्या. त्यात १ टी स्पून तेल घालून थोडे गरम करा, आता गॅस तीव्र आचेवर ठेवून थालिपीठाचे पीठ घाला, व ते गोल आकारात पसरवा, थालिपीठ अति पातळ तसेच जास्त जाड नसावे,  व झाकण न ठेवता, एक ते दोन मिनिटे शिजवून ते पलटून घ्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या....

चटपटीत बीट गाजर सॅलड

इमेज
सॅलड ऐकलं की खूप बोरिंग पदार्थ डोळ्यासमोर येतो. परंतु याच सॅलडला तुम्ही योग्यपद्धतीने ड्रेसिंग केलंत आणि योग्य पदार्थांच कॉम्बिनशन केलंत तर त्याची चव वाढतेच व अगदी रोज खायला ही हा पदार्थ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. साहित्य: बीट- १/२ लहान. काकडी -१/२ लहान. गाजर - १/२ लहान. टोमॅटो  - १ मध्यम. बारिक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून. बारीक चिरलेली हिरवी मिरची – १/४ टी स्पून (पर्यायी). धने जिरे पावडर - १/४ टी स्पून. काळी मिरी पावडर - १ चिमूटभर. काळे मीठ – चिमूटभर. लिंबाचा रस– १/४ टी स्पून. (आवश्यक) मीठ - चवीनुसार. मंगलोरिअन फरसाण - १ टे स्पून. कृती : वरील सर्व भाज्या अगदी बारीक आकारात चिरुन घ्या. उरलेले साहित्य त्यात घालून हलक्या हाताने मिक्स करा. अगदी झटपट सॅलड तयार झाले. नक्की करून पाहा आणि कंमेंट करून प्रतिक्रिया कळवा तसेच रेसिपी देखील इतरांना शेअर करा. टीप : मंगलोरिअन फरसाण उपलब्ध नसल्यास तुम्ही फक्त वरील इतर साहित्य वापरून देखील हे सलाड करू शकता, परंतु हे फरसाण सॅलड ची चव अणखी वाढवते.

उपवासाचे थालीपीठ

इमेज
उपवासाची मिक्स भाजणी/राजगिरा पीठ - १/२ पेला. बटाटा किसून -१ मध्यम.(कच्चा). हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. जिरे/जिरे पावडर – १/४ टी स्पून. साखर – १/२ टी स्पून. कोथिंबीर बारीक चिरून – १/४ टी स्पून. पाणी – आवश्यकतेनुसार. तूप – १ ते २ टीस्पून. मीठ – चवीनुसार. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि सांडगे किंवा मंचुरीयनच्या पीठाएवढे पातळ करा.  एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे तूप सोडा, व थालीपीठाचे पीठ फ्राय पॅन वर टाका व पसरवून थालीपीठ थापा, जास्त जाड नको, आता ते छान खरपूस भाजून घ्या, एक मिनिटानंतर त्यावर झाकण झाका, व एक मिनिट शिजू द्या, चर्रर् आवाज आल्यास समजावे थालीपीठ व्यवस्थित भाजले गेले आहे आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या. हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी छान खरपूस भाजा. प्रत्येक बाजू भाजण्यास साधारण दिड ते दोन मिनिटे लागतील. टीप : हे थालीपीठ साखर न घालता ताजे घट्ट दही  बरोबर सर्व्ह करा. दह्यासोबत हे थालिपीठ छान चविष्ट लागते. सर्व्ह : वरील मिश्रणातुन मध्यम आकाराची दोन थालिपीठं होतात.

मसाले भात

इमेज
बासमती तांदूळ - २+१/२ वाट्या. लिंबू १/२. कोथिंबीर १ मूठ चिरुन. पुदिना ४-५ काड्या. दही १/३ पेला, 80 ग्राम्स. वाटणे - १/४ पेला. बटाटे -३ मध्यम. कांदे - ३ मोठे उभे चिरून. टोमॅटो – १ प्युरी, १ उभा चिरुन. गाजर – १ लांब. फ्लॉवर – १/२ किलो. तोंडली - ५-६ उभी चिरुन. काजूचे तूकडे - १ टे स्पून (पर्यायी). पनीर क्युब्स - ६-७ (पर्यायी). हिरवी मिरची – १/२ बारीक चिरून, १/२ उभी चिरुन. आले लसूण पेस्ट - १ टेस्पून. हिरवी वेलची - ४ तेजपत्ते - ४ लवंग – ८ ते९ काळी मिरी – ८ ते ९ जवित्री - १/२. चक्रीफूल - १/२. तेल – ३ ते४ टेस्पून. जिरे – १/४ टी स्पून. गरम मसाला पावडर – १ टी स्पून. पाव भाजी मसाला – १/२ टी स्पून. कांदा लसूण मसाला १/४ – टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर – २ टी स्पून. धणे पावडर – २ टी स्पून. कृती : कुकर मध्ये १-२ टेस्पून तेल घालून सर्व भाज्यांचे क्युब्स फ्राय करून घ्या. थोडेसे मीठ घाला, थोडीशी हळद घाला, जिरे घाला, खडे मसाले अर्धे घाला. आता २ कांदे घाला, छान परतून घ्या. कोथिंबीर घाला, पुदिना चिरुन घाला. आता हे मिश्रण बाजूला काढा उरलेले कांदे कुकर मध्ये तेल घालून ब्राउन होईपर्यंत परता, त्यानंतर सर्व पा...

कस्टर्ड शिरा

इमेज
रवा (जाड किंवा मध्यम) - १ वाटी. साखर – १ वाटी. तूप – १/२ वाटी. दूध – १/२ वाटी. पाणी – २+१/२ वाटी. (उकळते पाणी). व्हॅनिला कस्टर्ड पावडर – १ टी स्पून. ड्राय फ्रुटस चे काप – १ टेस्पून. ड्राय फ्रुट पावडर – १ टी स्पून. वेलची पावडर – १/४  टी स्पून. जायफळ पावडर – चिमूटभर. सुंठ पावडर – चिमूटभर. हळद – चिमूटभर. मीठ – चिमूटभर. मनुके – ८-१०. केळं – १/२ (पर्यायी). तुळशी चे पान – १. केवडा एस्सेन्स – १ -२ थेंब. कृती : एका जाड बुडाच्या कढईत रवा १-२ मिनीटे भाजून घ्या मग त्यात तूप घालून ते थोडे परतवून घ्या. आता त्यात ड्रायफ्रूटस चे काप व ड्रायफ्रूट पावडर घाला रव्याचा रंग हलका पिवळसर येईल इतपत भाजा, त्याहून जास्त भाजू नये. आता त्यात हळद, मीठ घालून परतून घ्या, व केळ्याचे पातळ काप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या, आत्ता यात निम्मी साखर घालून मिक्स करून घ्या, व गॅस हाय फ्लॅम वर ठेवून गरम पाणी घाला व लगेचच झाकण ठेवून गॅस लो करा आणि २ मिनीटे शिजू द्या. आता झाकण काढून त्यात गरम दूध,उरलेली साखर, वेलची, जायफळ, सुंठ पावडर घाला, व चांगले मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून ३ ते ४ मिनीटे शिजू द्या. आता झाकण काढून त्यात...

फिश फ्राय

इमेज
साहित्य : पापलेट – ४. (पापलेट ऐवजी इतर कोणताही मासा वापर्य शकता) घरचा मसाला / (मालवणी मसाला) – ३ टी स्पून. गरम मसाला पावडर – २ टी स्पून. काश्मिरी मिरची पावडर – ३ टी स्पून. धने पावडर – ३ टी स्पून. हळद पावडर – १/४ टी स्पून. कांदा लसूण मसाला -  १/४ टी स्पून. लिंबाचा रस – २ टी स्पून आले लसूण पेस्ट – ४ टी स्पून पाणी – गरजेनुसार. तेल – २ ते ३ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : पापलेट स्वच्छ करून त्याचे बारीक लांब तुकडे करून धुवून घ्या. तेल सोडून वरील इतर सर्व साहित्य एकत्र करुन घ्या व  तुकड्यांना व्यवस्थित लावून १ तास फ्रिज मध्ये ठेवा. गरज वाटल्यास मसाल्यात थोडे पाणी घालू शकता म्हणजे पापलेट चे तुकडे पुर्णपणे मसाल्याने माखले जातील. आता एका पॅन मध्ये थोडेसे तेल घालून गरम करून घ्या व त्यात पापलेटचे तुकडे थोडे अंतर ठेवून ठेवा, जेणेकरून पलटताना मासे तुटणार नाहीत.  पापलेट चे तुकडे मंद आचेवर भाजून घ्या (साधारण २ ते ३ मिनीटे). आता मासे पालटून दुसरी बाजू देखील लालसर भाजून घ्या. पापलेट फ्राय तयार झाले. हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा स्टार्टर म्हणून पुदिना चटणी बरोबर ही सर्व्ह करू शकता.