दोडक्याची चटणी (शिराळ्याची चटणी)
साहित्य : दोडका - २५० ग्रॅम. हिरव्या मिरच्या – ३ ते ४. लसूण – ८ ते ९ पाकळ्या. राई - चिमूटभर. जिरे – चिमूटभर. हळद – १/४ टी स्पून. हिंग – १/४ टी स्पून. तेल – २ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : कोवळे दोडके स्वछ धुवून त्याच्या साली काढून टाकुन अगदी बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची व लसणाचा जाड ठेचा वाटून घ्या. आता एका कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात राई घाला ती तडतडली की जिरे घाला, आता हिरवी मिरची व लसूण चा जाडसर ठेचा घाला ती किंचित परतवून त्यात हळद व हिंग घाला व ते मिक्स करुन त्यात बारीक चिरलेला दोडका घाला, सर्व मिश्रण चांगले परतवून घ्या. व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून ३-४ मिनीटे शिजू द्या व अध्ये मध्ये परतत राहा. आता झाकण काढून पाणी पूर्ण आटेपर्यंत चटणी परतत राहा. पाणी आटून चटणी कोरडी झाली की गॅस बंद करा. दोडक्याची झटपट, चविष्ट चटणी तयार आहे नक्की करून पाहा, व आवडल्यास लाईक आणि शेअर करा.