पोस्ट्स

थालीपीठ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उपवासाचे धिरडे.

इमेज
  राजगिरा पीठ – १ सुक्क्या खोबऱ्याची पावडर – २ टी स्पून. हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. धने जिरे पावडर – १/४ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. बारीक चिरलेली कोथिंबीर - १/२ टी स्पून. पाणी – १/३ पेला. तेल – १ ते २ टीस्पून. काळे मीठ – १/४ टी स्पून. कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि इडलीच्या पीठाएवढे घट्ट असावे. एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे त तेल किंवा तूप गरम करा व गॅस तीव्र आचेवर ठेवून वरील मिश्रण फ्राय पॅन वर गोलाकार पसरा. धिरडे थोडे जाडच ठेवावे, आता झाकण ठेवून ते २ ते ३ मिनीटे छान खरपूस भाजून घ्या आता झाकण काढून आणखी अर्धा ते एक मिनिट शिजू द्या व छान कुरकुरीत भाजू द्या, आता दुसरी बाजू देखील अशाचप्रकारे भाजून घ्या. उपवासाचे धिरडे तयार आहेत.

उपवासाचे काकडीचे थालीपीठ

इमेज
साहित्य : काकडीचा किस -१/२ वाटी. राजगिरा पीठ - १/२ वाटी. हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. धने जिरे पावडर – १/४ टी स्पून. जिरे – चिमुटभर. साखर – १/२ टी स्पून. काळे मनुके – १ चमचा. पाणी – आवश्यकतेनुसार. तूप – १ ते २ टीस्पून. काळे मीठ – चिमूटभर. मीठ – चवीनुसार. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि चपाती चे पीठ मळतो त्यापेक्षा अगदी पातळ असावे. एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे तूप सोडा, व थालीपीठाचे पीठ फ्राय पॅन वर गोलाकार पसरवून थालीपीठ थापा, जास्त जाड नको, आता ते छान खरपूस भाजून घ्या व अर्धा ते एक मिनिट शिजू द्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या. टीप : हे थालीपीठ गोड दही किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

काकडीचे थालीपीठ

इमेज
साहित्य : काकडी – ३ मध्यम. हिरवी मिरची - २ बारीक चिरून. कोथिंबीर – १ टी स्पून बारीक चिरून. आले लसूण पेस्ट – १ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. मिरची पावडर – १/४ टी स्पून. गरम मसाला – १/२ टी स्पून. धने जिरे पावडर - १ टी स्पून. हिंग – चिमूटभर. हळद  – १/४ टी स्पून. जिरे – १/४ टी स्पून. ओवा – १/४ टी स्पून. साखर – १/२ टी स्पून. काळे मीठ – चिमूटभर मीठ – चवीनुसार. पाणी – आवश्यकतेनुसार. गव्हाचं पीठ – १+ १/४ पेला. चण्याच्या डाळीचं पीठ – १/४ पेला. तांदळाचे पीठ – १/२ पेला  ज्वारीचं पीठ – ३ टी स्पून. तेल – ४ ते ५ टीस्पून. कृती : एका थाळीत काकडी किसून घ्या, त्यात वरील इतर सर्व जिन्नस एकत्र करा,  आता पाणी न वापरता भजीच्या मिश्रणासारखे पातळ मिश्रण तयार करा, मिश्रण घट्ट झाले तरच पाण्याचा वापर करावा अन्यथा टाळावा. आता एक फ्राय पॅन गरम करून घ्या. त्यात १ टी स्पून तेल घालून थोडे गरम करा, आता गॅस तीव्र आचेवर ठेवून थालिपीठाचे पीठ घाला, व ते गोल आकारात पसरवा, थालिपीठ अति पातळ तसेच जास्त जाड नसावे,  व झाकण न ठेवता, एक ते दोन मिनिटे शिजवून ते पलटून घ्या, आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या....

उपवासाचे थालीपीठ

इमेज
उपवासाची मिक्स भाजणी/राजगिरा पीठ - १/२ पेला. बटाटा किसून -१ मध्यम.(कच्चा). हिरवी मिरची बारीक चिरून– १. आले किसून – १/४ टी स्पून. शेंगदाणा कूट – ३ टी स्पून. जिरे/जिरे पावडर – १/४ टी स्पून. साखर – १/२ टी स्पून. कोथिंबीर बारीक चिरून – १/४ टी स्पून. पाणी – आवश्यकतेनुसार. तूप – १ ते २ टीस्पून. मीठ – चवीनुसार. कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करा व नीट मिसळा, आणि सांडगे किंवा मंचुरीयनच्या पीठाएवढे पातळ करा.  एक नॉनस्टिक/फ्राय पॅन गरम करा, त्यावर थोडेसे तूप सोडा, व थालीपीठाचे पीठ फ्राय पॅन वर टाका व पसरवून थालीपीठ थापा, जास्त जाड नको, आता ते छान खरपूस भाजून घ्या, एक मिनिटानंतर त्यावर झाकण झाका, व एक मिनिट शिजू द्या, चर्रर् आवाज आल्यास समजावे थालीपीठ व्यवस्थित भाजले गेले आहे आता दुसरी बाजू देखील भाजून घ्या. हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी छान खरपूस भाजा. प्रत्येक बाजू भाजण्यास साधारण दिड ते दोन मिनिटे लागतील. टीप : हे थालीपीठ साखर न घालता ताजे घट्ट दही  बरोबर सर्व्ह करा. दह्यासोबत हे थालिपीठ छान चविष्ट लागते. सर्व्ह : वरील मिश्रणातुन मध्यम आकाराची दोन थालिपीठं होतात.

कोबी थालीपीठ

इमेज
कोबीचे फायदे: कोबीमध्ये व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते, कोबी आपले पचन सुधारते. स्वयंपाकासाठी कोबी नेहमी ताजे निवडा. तर कोबी थालीपीठ कसे बनवायचे त्याची कृती पाहू साहित्य :  कोबी २५० ग्रॅम. आले लसूण पेस्ट १ टीस्पून. मिरचीची पेस्ट १/3 टीस्पून. जिरे १/४ टीस्पून. गव्हाचे पीठ (१ आणि १/२ चहाचा कप). चण्याच्या डाळीचे पीठ (१ आणि १ / २ टेस्पून) चवीनुसार मीठ. आवश्यकतेनुसार पाणी.  तेल - २ टीस्पून.  तूप - पर्यायी  कृती : प्रथम कोबी धुवून बारीक चिरून घ्या.  एका मोठ्या थाळीत कोबी, सर्व पेस्ट, जिरे व मीठ मिसळा.  सरसरित मऊसर कणिक मळा आवश्यक असल्यास थोडेसे पाणी वापरू शकता आता मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा. कोणताही प्लास्टिक चा कागद किंवा दुधाचे प्लास्टिक कव्हर घ्या, आणि आपल्या हातांना व प्लास्टिकला थोडेसे तेल लावा. आता गोळे थापुन थालीपीठ बनवा. गरम तव्यावर थोडे तेल घाला, थालीपीठ उचलताना प्लास्टिक सहित उचला व थालीपीठ तव्यावर अलगद सोडा. आता त्यात बोटाने मध्ये  ३-४ छिद्रे करा जेणेकरून थालीपीठ चांगले शिज...