कोबी थालीपीठ

कोबीचे फायदे: कोबीमध्ये व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते, कोबी आपले पचन सुधारते. स्वयंपाकासाठी कोबी नेहमी ताजे निवडा.

तर कोबी थालीपीठ कसे बनवायचे त्याची कृती पाहू

साहित्य

  • कोबी २५० ग्रॅम.
  • आले लसूण पेस्ट १ टीस्पून.
  • मिरचीची पेस्ट १/3 टीस्पून.
  • जिरे १/४ टीस्पून.
  • गव्हाचे पीठ (१ आणि १/२ चहाचा कप).
  • चण्याच्या डाळीचे पीठ (१ आणि १ / २ टेस्पून)
  • चवीनुसार मीठ.
  • आवश्यकतेनुसार पाणी. 
  • तेल - २ टीस्पून. 
  • तूप - पर्यायी 

कृती:

  • प्रथम कोबी धुवून बारीक चिरून घ्या. 
  • एका मोठ्या थाळीत कोबी, सर्व पेस्ट, जिरे व मीठ मिसळा. 
  • सरसरित मऊसर कणिक मळा आवश्यक असल्यास थोडेसे पाणी वापरू शकता आता मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा.
  • कोणताही प्लास्टिक चा कागद किंवा दुधाचे प्लास्टिक कव्हर घ्या, आणि आपल्या हातांना व प्लास्टिकला थोडेसे तेल लावा.
  • आता गोळे थापुन थालीपीठ बनवा.
  • गरम तव्यावर थोडे तेल घाला, थालीपीठ उचलताना प्लास्टिक सहित उचला व थालीपीठ तव्यावर अलगद सोडा.
  • आता त्यात बोटाने मध्ये  ३-४ छिद्रे करा जेणेकरून थालीपीठ चांगले शिजेल.
  • आता ते लालसर रंग येई पर्यंत भाजू द्या. अर्ध्या मिनिटानंतर झाकण ठेवा.
  • चर आवाज आला म्हणजे थालीपीठ.
  • शिजले आहे आता ते पलटून दुसरी बाजू देखीलचं खरपूस भाजून घ्या.
  •  थालीपीठवर तूप लावून खोबऱ्याच्या चटणी, सॉस किंवा शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करा.
  • तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा आणि तुम्हाला आवडली तर नक्की कंमेंट आणि शेअर करा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

मेथीची भाजी

वांग्याचं भरीत