पोस्ट्स

भाज्या लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दोडक्याची चटणी (शिराळ्याची चटणी)

इमेज
  साहित्य  : दोडका - २५० ग्रॅम. हिरव्या मिरच्या – ३ ते ४. लसूण – ८ ते ९ पाकळ्या. राई - चिमूटभर. जिरे – चिमूटभर. हळद – १/४ टी स्पून. हिंग – १/४ टी स्पून. तेल – २ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती  : कोवळे दोडके स्वछ धुवून त्याच्या साली काढून टाकुन अगदी बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची व लसणाचा जाड ठेचा वाटून घ्या. आता एका कढईत तेल चांगले तापवून घ्या त्यात राई घाला ती तडतडली की जिरे घाला, आता हिरवी मिरची व लसूण चा जाडसर ठेचा घाला ती किंचित परतवून त्यात  हळद व हिंग घाला व ते मिक्स करुन त्यात बारीक चिरलेला दोडका घाला, सर्व मिश्रण चांगले परतवून घ्या. व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून ३-४ मिनीटे शिजू द्या व अध्ये मध्ये परतत राहा. आता झाकण काढून पाणी पूर्ण आटेपर्यंत चटणी परतत राहा.  पाणी आटून चटणी कोरडी झाली की गॅस बंद करा. दोडक्याची झटपट, चविष्ट चटणी तयार आहे नक्की करून पाहा, व आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

वांग्याचं भरीत

इमेज
साहित्य : मोठे काळे वांगे – १. लसूण – १ गड्डी (१२ ते १५ पाकळ्या). हिरव्या मिरच्या - ४. आले – १/४ इंच. जिरे – १/४ टी स्पून. राई – १/४ टी स्पून. हळद -१/४ टी स्पून. हिंग – १/४ टी स्पून. कडीपत्ता – ६ ते ७ पाने. तेल – ५ ते ६ टी स्पून. मीठ – चवीनुसार. कृती : वांगं गॅस वर ठेवून सर्व बाजूनी साल पूर्ण काळी होऊन पापुद्रे निघेपर्यंत भाजून घ्यावे. आता ते थंड होऊ द्या. लसूण, आले हिरवी मिरचीचा खरखरीत जाडसर ठेचा मिक्सर ला वाटून घ्या. वांगं थंड झाल्यावर त्याची साल काढून वरचे वर पाण्याने धुवून घ्या व मधून कापून घ्या. आता एक तवा गरम करून त्यावर तेल घाला, तयार राई घालून तडतडू द्या त्यानंतर जिरे घालून परतून घ्या व कडीपत्ता थोडा चुरडून घाला. त्यानंतर मिक्सर मध्ये वाटलेलं ठेचा घालून हळद व हिंग घाला आणि १ मिनिटं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या. आता त्यात वांग घाला व ते तव्यावरच कुस्करून घ्या. मीठ घालून सर्व मिश्रण एक ते दीड मिनिटे चांगले परतवून घ्या.  व झाकण ठेवून दीड ते २ मिनीटे शिजू द्या परंतु मध्ये मध्ये परतत राहावे जेणेकरून भाजी तव्यावर चिकटणार नाही. आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात आणखी तेल घालू शक...

मेथीची भाजी

इमेज
मेथीची भाजी ही अत्यंत पौष्टिक असते यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, जीवनसत्त्वे व कॅल्शिअम, मॅग्नेशियम, लोह यांसारखी खनिजे असतात. तसेच यातील तंतुमय पदार्थ आपला कोठा स्वछ राखण्यास मदत करतात. म्हणून रोजच्या आहारात याचा समावेश करणे अत्यंत फायद्याचे ठरते. ही भाजी बाळंतिणीसाठी अतिशय उपयुक्त आहे, खालील कृतीत मिरची चा वापर कमी करून पातळ भाजी करून बाळंतिणीला देता येते. साहित्य : मेथीची जुडी – १. शेंगदाणे – १/२ वाटी. हिरव्या मिरच्या -  ३ ते ४. लसूण – ७ ते ८ पाकळ्या. जिरे – चिमूटभर. मीठ - चवीनुसार. तेल – ४ ते ५ टी स्पून. कृती : मेथीची भाजी पाने आणि पानालगत कोवळ्या बारीक कड्यांसाहित निवडून घ्या. ही भाजी एका मोठ्या पातेल्यात कोमट पाणी घालून त्यात टाका व थोडी अलगद ढवळा. व ती पातेल्यातच राहू द्या त्यामुळे भाजीतले माती व जंतू खाली तळाला जातात शिवाय भाजीचा कडवटपणा कमी होतो आता शेंगदाणे धुवून ती मंद आचेवर तव्यावर खरपूस भाजून घ्या, ह्यास साधारण ६ ते ७ मिनीटे लागतील. आता भाजलेले शेंगदाणे थोडे कोमट झाले की त्यावर वाटीच्या साहाय्याने दाब देऊन साले काढून घ्या. आता मिक्सर मध्ये हे शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जिर...

चवळीची पालेभाजी

इमेज
लो कॅलोरी, फायबर युक्त, चविष्ट अगदी कमी साहित्यात कमी वेळात व बनवायला सोपी अशी पालेभाजी. साहित्य : चवळीची पालेभाजी -१ जुडी. लसूण पाकळ्या  - १०-१२. हिरव्या मिरच्या -१-२ लहान. मीठ - चवीनुसार. तेल - १ टी स्पून. कृती : चवळीची पाने अगदी कमी देठा सोबत निवडून घ्या व स्वछ धुवून घ्या. हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. एका कढईत तेल तापवून घ्या. त्यात हिरवी मिरची व लसणाचा ठेचा घाला एकदा परतून लगेचच भाजी घाला व चांगली परतून घ्या. आता झाकण ठेवून १-२ मिनीटे शिजवा एकदा परतून आणखी १-२ मिनिटे शिजवा आता मीठ घालुन भाजी परतून घ्या. व पुन्हा झाकण ठेवून १ मिनीटे शिजवा. भाजी तयार आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते. टीप : पालेभाजी शिजल्यावर आळुन कमी होते म्हणून पालेभाजी करताना मीठ नेहमी शेवटी टाकावे म्हणजे भाजी खारट होत नाही.

बीट ची भाजी

इमेज
बीट चे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. बीट आपले हिमोग्लोबिन वाढीस मदत करतो, दात आणि हाडं मजबूत बनवतो, तसेच आपली त्वचा व केसांसाठी देखील फायदेशीर आहे. चला मग बीटच्या भाजी ची पौष्टिक रेसिपी पाहुयात! साहित्य : बीट - ५०० ग्रंँम. कांदे - २ मोठे. हिरवी मिरची चिरून - ५,६. खवलेला ओला नारळ - १+१/२ चहाचा कप. लसूण ठेचून - ७,८ पाकळ्या. राई - १/४ टी. स्पून जिरे - १/४ टी. स्पून कढीपत्ता - ७-८ पाने. तेल - १ टेबल स्पून. मीठ - चवीनुसार.  कृती: सर्व प्रथम बीट किसून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात राई घाला व ती  चांगली तडतडू दया. त्यानंतर जिरे घालून लालसर परतावे. आता लसूण घालून पिवळसर होईपर्यंत परतावा मग हिरवी मिरची घालून परता. आता कढीपत्त्याची पाने चुरडून घालावी व बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता त्यानंतर खवलेले खोबरे घालून थोडे तेल सूटेपयँत परतावे. आता कीसलेले बीट घालून परतावे व झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवा, चवीनुसार मीठ घालून परतावे व पुन्हा झाकण ठेवून ३-४ मिनिटे शिजवावे. आता गँस बंद करून झाकण ठेवून २ मिनिटे भाजी वाफू द्यावी. बीटची भाजी तयार आहे. ही भाजी चपाती व ...