चिकन टिक्का (ऑईल फ्री)
चिकनमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते, त्यामध्ये चरबी कमी असते. हे चयापचय वाढविण्यास मदत करते. म्हणून आज आपण एक सुपर इझी चिकन रेसिपी पाहू. साहित्य: २५० ग्रॅम बोनलेस चिकन (बारीक तुकडे). दही २ टेस्पून. आले लसूण पेस्ट १ टिस्पून. लाल तिखट १ टीस्पून. काश्मिरी लाल तिखट १/२ टीस्पून (पर्यायी). हळद पावडर १/४ टीस्पून. धणे पूड १ टीस्पून. जिरे पूड १/२ टीस्पून. लिंबाचा रस १ टीस्पून. कसुरी मेथी (पर्यायी). चवीनुसार मीठ. ऑरेंज रेड फूड कलर 1 चिमूट (पर्यायी). कृती: प्रथम चिकन चांगले धुवून घ्या. नंतर सर्व साहित्य एक-एक करुन घालून एकत्र करा आणि चिकन मध्ये घाला आणि १५ मिनिटांनसाठी मॅरीनेट करा. नंतर तवा चांगला गरम करून चिकनचे तुकडे त्यावर पसरवा व मॅरीनेशन ही घाला. चिकन चांगले काळपट तपकीरी रंगाचे डाग येईपर्यंत भाजू दया. ह्यास साधारण ४-५ मिनीटे लागतील. आता दुसरी बाजू देखील ३-४ मिनिटे भाजून घ्या. वेळ कमी असल्यास चिकन तव्यावर शिजवून घेऊन नंतर स्टीलच्या स्क्यूमध्ये ठेवून थेट गॅसवर ठेवून भाजू शकता जेणेकरून त्याला स्मोकी फ्लेवर येतो. आता चिकन टिक्का सर्व्ह करण्यासाठी त...